एमजीएम हेल्थकेअरच्या विवेका हॉस्पिटल च्या अँडवास हार्ट फेलुअर क्लिनिक आणि हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्रामचे लोकार्पण
नागपूर : नागपूर शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा या मोठ्या प्रमाणात असून विदर्भाबरोबरच शेजारील राज्य छत्तिसगड आणि मध्यप्रदेश येथून सुद्धा रुग्ण उपचारासाठी येतात. खाजगी रुग्णालयातील सुविधा सुद्धा अधिक गुंतवणुक आणि नव्या तंत्रज्ञानाव्दारे वाढल्या पाहिजेज्यामुळे नागपूर एक मेडीकल हब म्हणून विकसित होईल , असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले . नागपूरमध्ये एमजीएम हेल्थकेअरच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘ऍडव्हान्स हार्ट फेल्युअर क्लीनिक आणि हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम’ च्या लोकार्पणप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते . याप्रसंगी एमजीएम हेल्थकेअर च्या कार्डिएक सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ.बालकृष्णन उपस्थित होते .
नागपूरच्या सुभाष नगर येथील नाईक लेआउट स्थित असणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण तसेच हृदय रोगासंदर्भातील सुविधा उपलब्ध होणार आहेत . विवेका हॉस्पिटलने एक हजार रुग्णखाटा क्षमतेची सुविधा निर्माण करावी यासाठी त्यांना पर्यायी जमीन देण्याचे सुद्धा आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले .
कोवीडच्या काळामध्ये डॉक्टरांनी देवदूता प्रमाणे काम केले असून अनेक लोकांचे जीव वाचवले . खाजगी क्षेत्रामधून जर वैद्यकीय क्षेत्रात गुतवणूक झाली तर 15 एम्स आणि 500 वैद्यकीय महाविद्यालय देशात स्थापन केली जाऊ शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितले . ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये वैद्यकीय सुविधा यांच विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे . वैद्यकीय उपकरणांची किंमत सुद्धा कमी व्हावी याकरिता विशाखापट्टणम येथे मेडिकल इक्विपमेंट डिवाइस पार्कची उभारणी करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली .
विवेका हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण आणि इतर हृदयरोगाचा संदर्भातील सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या हॉस्पिटलच्या प्रशासनाचे सुद्धा आभार मानले .या कार्यक्रमाप्रसंगी एमजीएम हेल्थकेअर ‘विवेका हॉस्पिटल येथील डॉक्टर्स , अधिकारी उपस्थित होते .