आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते उद्घाटन : ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे आयोजन
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि नुकताच झालेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस या दोन्ही औचित्याने पूर्व नागपुरातील प्रभाग २६मध्ये प्रादेशिक आयुर्वेदिक संशोधन संस्थेच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.२४) आरोग्य तपासणी आणि महिलांच्या समस्यांसंदर्भात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने ‘सेवा ही समर्पण’ या भावनेतून भाजपा प्रदेश सचिव तथा प्रभाग २६चे नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्यावतीने पडोळे नगर येथील नागोबा मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रादेशिक आयुर्वेदिक संशोधन संस्थेचे संचालक डॅा रेड्डी, प्रा. प्रमोद पेंडके, प्रभाग २६च्या नगरसेविका समिता चकोले, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, महामंत्री राजू गोतमारे, जे.पी.शर्मा, प्रभाग २६चे भाजपा अध्यक्षद्वय राजेश संगेवार, सुरेश बारई व अशोक देशमुख, वार्डच्या महिला अध्यक्षा सिंधु पराते, डॉली सारस्वत, माजी नगरसेविका सिंधु डेहलीकर आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने संपूर्ण शहरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिलांना होणारा मासिक पाळीचा त्रास आणि मासिक पाळीदरम्यान किंवा नंतर असामान्यरित्या होणारा रक्तस्त्राव यासंबंधी तपासणी, उपचार आणि समुपदेशनाच्या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये सुमारे २०० महिलांनी सहभाग नोंदविला. याशिवाय शिबिरामध्ये अन्य आरोग्य तपासणी सुद्धा करण्यात आली.
शिबिरामध्ये आरोग्य सुविधेकरिता डॉ. प्रशांत शिंदे, गुलशन कावडे, डॉ. दिप्ती कवाडे, कांचन पांडे, डॉ. पवन गवळी, आकांक्षा बोधरे, शुभम मरसकोल्हे, कोमल ठाकरे, इशानी ठेंगडी, राजीव मिश्रा, अमन ताजने, साहिल पाटील, सिद्धार्थ, कोमल आदी चमूने सहकार्य केले.
शिबिराच्या यशस्वीसाठी बुथ प्रमुख विक्रम डुमरे, रॅाबीन गजभिये, राम सामंत, किशोर सायगन, मोसमी वासनिक, विशाखा धारगावे, किरण सायगन, माधुरी झोडे, मोनाली काथवटे, प्रीत ढोले, शेषराव गजघाटे, आदींनी परिश्रम घेतले.