रामटेक– नागपूर जिल्हयातील नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 निवडणूक विभाग व पंचायत समितीतील 31 निर्वाचन गणाच्या पोट निवडणूका दिनांक 05 ऑक्टोबर 2021 रोजी होवू घातलेल्या आहेत.
पोट निवडणूका असलेल्या रामटेक, मौदा, उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्याकरीता निवडणूक निरिक्षक अधिकारी म्हणून पराते, यांची नोंदणी उपमहानिरिक्षक मुद्रांक शुल्क, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा मोबाईल नंबर 9822472735 असा आहे.
तरी याव्दारे नागपूर जिल्हयातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की, निवडणूकीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी कृपया निवडणूक निरिक्षक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
असे एका पत्रकाद्वारे , रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी आवाहन केले आहे.