नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर रोटरी डिस्ट्रिक्टचे आयोजन
नागपूर : जागतिक हृदय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर वेस्ट रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० यांच्या सहकार्याने बुधवारी (ता. २८) मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात निःशुल्क ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपमहापौर मनीषा धावडे यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी आरोग्य समिती सभापती महेश महाजन, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. निलू चिमुरकर आदी उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांची निःशुल्क ब्लड शुगर तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हृदयरोग दिनानिमित्त नागरिकांनी हृदयाची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.