५ कोटी रुपये निधीतून उत्तर नागपूर चा चेहरा मोहरा बदलणार
नागपूर : उत्तर नागपुरातील ब्लॉक क्रमांक १३, १४, व १५ अंतर्गत आज विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संपन्न झाले. एकूण ५ कोटी रुपये इतका निधी या विकास कार्यांवर खर्च होणार असून उत्तर नागपूरचा चेहरा मोहरा बदलणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दलित वस्ती सुधार योजना निधी अंतर्गत कामे
वैशाली नगर बिनाकी बांधकाम लीलाबाई वंजारी ते हनुमान सोसायटी केशव बोकडे यांचे घरापासून ते डॉ. मोहाडीकर दवाखाना पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम (निधी- रु. ४९.३३ लक्ष ) , मौजा बिनाकी, सुजाता नगर म्हाडा क्वार्टर खुल्या जागेचा विकास
( निधी- रु. २७.९७ लक्ष ), मौजा बिनाकी, पंचशील नगर मैदान येथे ग्रंथालय व ध्यान साधना केंद्राचे बांधकाम ( निधी- रु. ३४.०३ लक्ष ),
मिलिंद नगर येथे नाला संरक्षक भिंत बांधकाम ( निधी- रु. २३.४० लक्ष )
मौजा बिनाकी महेंद्र नगर बाबा बुद्धजी नगर गुरुद्वारा ते शितला माता मंदिर, येथील रस्त्याचे डांबरीकरण (निधी- रु. १५.०० लक्ष ), वैशाली नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन ते वैशाली नगर सिमेंट काँक्रीट रोडपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण (निधी- रु. २५.०० लक्ष), मौजा वांजरा, पाहुणे ले आउट भीमवाडी येथे सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकाम श्री गोलू यादव यांच्या घरापासून श्री मदने यांचे घरापर्यंत, (निधी – रु. २५.०९ लक्ष ), मौजा वांजरा, पाहुणे ले आउट येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ( निधी – रु. ३४.४७ लक्ष )
या विकास कामांचा समावेश आहे.
आमदार निधी अंतर्गत विकास कामे
मौजा वांजरी, विनोबा भावे नगर श्री. राजेश राठोड यांचे घरापासून ते श्री. बहल फटींग यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम
( निधी – रु. १४.९१ लक्ष ), मौजा वांजरी, विनोबा भावे नगर श्री द्वारका वर्मा ते श्री गेंदलाल रसदार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम ( निधी – रु. १४.९२ लक्ष )
मौजा वांजरी विनोबा भावे नगर , श्री मोनूदास मणिपुरी ते श्री रोहित जंजीर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम (निधी – रु. १४.९० लक्ष ), मौजा नारी, चैतन्य नगर खसरा क्रमांक १४१/१, १४५/३, आणि १४६/१० येथे नाला संरक्षक भिंत बांधकाम ( निधी- रु. १३.०२ लक्ष ) या विकास कामांचा समावेश आहे.
दलितेत्तर वस्ती विकास योजना निधी अंतर्गत कामे
मौजा वांजरा, यशोधरा नगर कॉम्प्लेक्स ते हमीद नगर कब्रस्तान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम
( निधी – रु. ३९.३६ लक्ष ), मौजा वांजरा, बिलाल नगर खसरा क्रमांक ७७/२ येथे रस्त्याचे बांधकाम, (निधी – रु. ३१.८८ लक्ष), गुलशन नगर माँ शारदा लँड डेव्हलपर येथे रस्त्याचे बांधकाम (निधी – रु. ३६.४८ लक्ष) मौजा वांजरी, एकता फुटबॉल ग्राउंड येथे कंपाऊंड वॉल, लेव्हलिंग, वॉकिंग ट्रॅकचे बांधकाम ( निधी – रु. ४२.८१ लक्ष ), मौजा कळमना , विशाल नगर प्रीती हाऊसिंग सोसायटी खसरा क्रमांक ८६/१ येथे डब्ल्यू बी एम रस्त्याचे बांधकाम
( निधी – रु. ३६.५१ लक्ष )
या कामांचा समावेश आहे.
या भूमिपूजन समारंभ समयी रत्नाकर जयपूरकर, ठाकूर जग्यासी, सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, मूलचंद मेहर, परसराम मानवटकर, दिनेश यादव, यांचेसह नासुप्र चे अधिकारी विशाल कांबळे, राजेश समरीत, चंद्रकांत सदावर्ते, मनीष निनावे, मनीष हटेवार, नरेश ठाकूर, अरुण ठाकूर, धर्मेश पाटील, विजय चांदेकर, सचिन भाभाडे, अंजली सामतकर, उपस्थित होते.
यावेळी कोव्हिड नियमांचे पालन करीत मन्सूर खान, शेख शहाबुद्दीन, सुरेश जग्यासी, विजयाताई हजारे, सतीश पाली, गौतम अंबादे, चेतन तरारे, विजय बांते, खुशाल हेडाऊ, बाबू खान, पवन धोटे, उत्तरेश वासनिक, नीलेश खोब्रागडे, सविता सांगोळे, प्रकाश नांदगावे, कैलाश यादव, राजेश कोहाड, योगेश्वर देवांगन, प्यारेलाल देवांगण, रामाजी उईके, संजय काटोले, विपुल महल्ले, देवा पाटील, नीलेश धोतरकर, दशरथ मालवी, महेश मुले, कल्पना गोस्वामी, नामदेव धोतरकर, सुमित तिवस्कर, रवी सपाटे, अशोक धकाते, राजू लाड, जितेंद्र वेळेकर, सचिन बोकडे, इंद्रपाल वाघमारे, पुंडलिक मेश्राम, कुंदा खोब्रागडे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.