Published On : Tue, Oct 5th, 2021
By Nagpur Today Nagpur News

सामाजिक न्याय भवन येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा

Advertisement

भंडारा:- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने 01 ऑक्टोंबर 2021 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथील सभागृहात जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी प्रा. सुधाकरराव वडेट्टीवार, भंडारा जिल्हा जेष्ठ नागरिक संघ (फेस्कॉम) यांचे अध्यक्षतेखाली तसेच फेस्कॉमचे कार्याध्यक्ष जाधवराव साठवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रत्नाकर बांडेबुचे, विधी व सेवाच्या ॲड. प्रियंका पशिने, तसेच समाज कल्याण कार्यालयाचे सहा.लेखाधिकारी किशोर पाथेडे यांचे प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे जेष्ठ नागरिक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झालेल्या सदानंद मोहतुरे व हिरामण लांजेवार यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाथोडे यांनी केले. प्रमुख उपस्थित असलेले जाधवराव साठवणे यांनी जेष्ठ नागरिक दिनाचे महत्व विषद केले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.रत्नाकर बांडेबुचे यांनी जेष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर जेष्ठ नागरिकांकरीता हेल्थ इज वेल्थ चा संदेश देवून जेष्ठांचे सामाजिक, मानसीक आरोग्य चांगले असावे. आठवणी हा जिवनाचा एक अविभाज्य अंग आहे. स्मृतीभंश आजाराबाबत माहिती देवून आपला मेंदु कसा ॲक्टिव्ह राहील याबाबत मार्गदर्शन केले. ॲड.प्रियंका पशिने यांनी विधी व सेवाविषयक माहिती देतांना जेष्ठ नागरिकांची व्याख्या काय असावी. जेष्ठ नागरिक कायदा 2007 याचे महत्व विषद केले. तसेच प्रा.सुधारकर वडेट्टीवार यांनी त्यांचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जेष्ठांना समाजात वावरतांना सन्मानपुर्वक वागणूक मिळते का? जर मिळत नसेल ते मिळवण्याकरीता आपण लढायला पाहिजे. शरीरकाठी ही मनुष्याची लक्ष्मी आहे. ती चांगली असणे आवश्यक आहे. वय वाढल्यामुळे व म्हातारा झाले म्हणून घरी रडत बसू नका, राजकीय, सामाजिक व आर्थिक या गोष्टींमुळे मनुष्यांवर परिणाम होतो. त्याकरीता सर्व क्षेत्रात सक्रिय रहा व भंडारा जिल्ह्यात स्थापित फेस्कॉम संघाबद्दल माहिती दिली.

आरोग्य विभागाचे चमुतर्फे ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार समाज कल्याण कार्यालयाचे लघुटंकलेखक प्रमोद गणवीर यांनी केले व भारत सरकार, महाराष्ट्र शासन व जनसेवा फाऊंडेशन तर्फे बेघर व अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची सेवा व काळजी घेण्याकामी राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 14567 ची माहिती देवून बेघर व अत्याचारग्रस्त वृध्दांना समस्या व तक्रारी निवारणासाठी टोल फ्री क्र. 14567 वर संपर्क करावा असे आवाहन केले. कार्यक्रमास भंडारा जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement