Advertisement
नागपूर : 2022 या वर्षात होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरावयाची मतदार यादीचे काम सध्या भारत निवडणूक आयोग यांच्याकडून चालू आहे. 1 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर होणार आहे.
1 जानेवारी 2022 ला नवीन मतदार 18 वर्षाचे होणार आहे, अशा व्यक्तींनी फॉर्म न. 6 भरून मतदार नोंदणी करावी. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर एनव्हीएसपी डॉट इन या लिंकवरून फार्म नंबर 6 डाउनलोड करता येईल.
तसेच बीएलओ, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, झोनल कार्यालय येथे फॉर्म मिळेल. वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.