– भारतीय मजदूर संघातर्फे सामाजिक समरसता दिनाचे आयोजन
नागपुर – श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचे देशाप्रती समर्पित जीवन प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करणारे आहे. त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणांचा विषय आहे. त्यांच्या या जीवनकार्यापासून प्रेरणा घेतल्यानेच आज असंख्य कार्यकर्ते तयार झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंपर्कप्रमुख अरविंद कुकडे यांनी केले.
भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशच्या वतीने डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथील अनंतराव भिडे सभागृहात श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक समरसता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेश अध्यक्षा शिल्पा देशपांडे, प्रमुख अतिथी भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा नीता चौबे व विदर्भ प्रदेश प्रांताचे महामंत्री गजानन गटलेवार मंचावर उपस्थित होते.
अरविंद कुकडे पुढे म्हणाले, एकीकडे स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र आजही प्रत्येकाला मंदिरामध्ये प्रवेश नाही. पाण्याच्या स्तोत्रावर अनेकांना परवानगी नाही. स्मशानभूमी सुद्धा वेगळी अशा समस्या कायम आहेत. स्मशानभूमी प्रत्येकाची सारखी असायला हवी ही मागणी आजही केली जाते. त्यामुळे देशाला एकसंघ करण्यासाठी आता प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी राजकीय व्यवस्था महत्त्वाची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे ठराव नऊ वर्षापूर्वीच केले असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी देशविघातक कृत्याद्वारे हिंदू समाजाचे विचार कमजोर करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे आवर्जून नमूद केले.
भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्षा नीता चोबे यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना सांगितले की, एक स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्याची केरळ व बंगाल पासून सुरुवात केली राष्ट्र उद्योग आणि श्रमिकांचे हीत साधने, साम्यवादाला परास्त करणे आणि शोषित, पीडितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ह्या मुख्य उद्देशाने भारतीय मजदूर संघाची स्थापना करण्यात आली. भारतीय मजदूर संघामुळे श्रमिक वर्गामध्ये समरसतेच्या भाव निर्माण होत आहे. यामुळे हळूहळू वृद्धी होत समाजामध्ये परिवर्तन घडून येत आहे. असेही नीता चोबे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांनी केले. विदर्भ प्रदेश अध्यक्षा शिल्पा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन नागपूर जिल्हा सरचिटणीस हर्षल ढोंबरे यांनी केले.
या कार्यक्रमाला गणमान्य नागरिक, विचारवंत, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
(नोट–व्यासपीठावर डावीकडून विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निता चोबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख अरविंद कुकडे आणि विदर्भ प्रदेश अध्यक्षा शिल्पा देशपांडे दिसत आहे.)