– वंचित घटकांच्या प्रतिनिधींशी निवडणूक विषयक बैठक
नागपूर : लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. लिंग, जात, धर्म, वंश या आधारावर भेदभाव करू नये. तृतीयपंथी व वारांगणा या वंचित घटकांनी निवडणूक प्रक्रीयेत सहभागी होवून मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात निवडणूक विषयक वंचित घटकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अभिमन्यू बोदवड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, तहसीलदार, राहूल सारंग, मतदार नोंदणी अधिकारी तसेच वंचित घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
1 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे, त्यांनतर 30 नोव्हेंबरपर्यंत विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमतंर्गत मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन 13, 14, 27 व 28 यादिवशी आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात तृतीयपंथीयांनी तसेच वारांगणांना स्वयंसेवी संस्थांनी नाव नोंदणीसाठी घेवून यावे. या शिबिरात नाव नोंदणी वगळणे, नावात बदल, स्थळात बदल, प्रभागात बदल, आदी कामे करण्यात येतील. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले
यावेळी मिनल कळसकर यांनी मतदार नोंदणी मोहिमेबाबत माहिती दिली. ऑफ लाईन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे नाव नोंदणी करता येते, असे त्यांनी सांगितले. स्वयंसेवी संस्थांनी वंचित घटकांना सहकार्य करून नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. या घटकांना घोषणापत्राच्या आधारावर नाव नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नाव नोंदणी नमुन्यात तृतीयपंथीसाठी रकाना दर्शविला आहे, त्यामध्ये बदल करून इतर असे रकान्यात दर्शविण्याची मागणी वंचित घटकांच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर लेखी अर्ज सादर करा, अर्जावर विचार करून निवडणूक आयोगाकडे मागणी सादर करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
राज्यस्तरीय ‘लोकशाही दिपावली’ स्पर्धेचे आयोजन
राज्य निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय लोकशाही दिपावली स्पर्धेचे आयोजन केले आहे. यातंर्गत आकाश दिवा व रांगोळी स्पर्धा 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला 11 हजार, द्वितीय 7 हजार, तृतीय 5 हजार व उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची एकूण 10 बक्षीसे देण्यात येणार आहे. नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आयोजित लोकशाही दीपावली स्पर्धा 2021 (आकाशदिवा आकाशकंदील आणि रांगोळी स्पर्धा) दिवाळी हा दिव्यांचा प्राचीन संस्कृतीमध्ये दिवा सकारात्मक प्रतिक मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या सणाला जितके अनन्य महत्व आहे, तितकेच भारतीय निवडणुकांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अनं ओघाने मतदार यादीला यदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमसुद्धा हे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदा लोक दीपावली स्पर्धा आयोजित केली आहे.
बऱ्याच मतदारांना असं वाटतं की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसं नाही, मतदान करण्यासाठी यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे, तेव्हा सर्व मतदारांनी मतदार यादी पाहावी, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावेत आणि 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून आपल्याला यंदाची दिवाळी लोकशाहीमय करायची आहे.
आकाशदिवा व रांगोळी स्पर्धेसाठी आपले फोटो आणि चित्रफीत एचटीटीपीएस कोलन हॅश फार्म्स डॉट https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा.