– प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पीडब्ल्यूडी ऑफिसर वर अतिक्रमण केल्याबद्दल कारवाईची मागणी
नागपूर : झिंगाबाई जुनी बस्ती निवासी अर्ज सादर करतो की , मनपाच्या मालकीचे असलेले गोधनी रोड मेनरोड विकास आराखडयातील सिमेंट रोड बांधण्याची मंजूरी का राज्य बांधकाम विभागाला हे अधिकार देण्यात आले होते. त्याप्रमाणें गेल्या वर्षापासून संथगतीने हे काम सुरु आहे . सर्व नियम धाब्यावर ठेवून वरील ठिकाणी बांधकाम सुरु आहे. याबद्दल नागरिकांनी मनपा विभागाला वारंवार पी.डब्लू.डी अधिका-यांना बजावून सांगितल्यावर सुद्धा हे अधिकारी ऐकायला तयार नाहीत. सध्या झिंगाबाई टाकळीच्या मुख्य चौकात काम सुरु आहे.
हे काम अक्षरश: वस्तीच्या महत्वाच्या जुन्या रस्त्यावर अतिक्रमण करून केले जात आहे. तसे पाटले तर नागपूर विकास आराखड्यानुसार हा रस्ता वस्तीपासून खूप दूर आहे व तसाच बांधायला पाहीजे होता व त्याला अयोग्य व धोखादायक पद्धतीने फक्त ३० फुटात ९ ० अंशाचा कोन दोन ठिकाणी दिला गेला आहे. त्यामुळे एकदा हा रस्ता अशाप्रकारे बनला तर नेहमी या ठिकाणी गाडया अडून कायम रहदारीचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून नम्र विनंती आहे की तात्काळ या रस्त्याचे बांधकाम थांबवुन आराखडीत रस्त्याप्रमाणे बांधकामाचे निर्देश देण्यात यावे. हे बांधकाम थांबविण्याकरिता आयुक्तांना या अगोदरच निवेदन दिले आहे. तसेच झिंगाबाई टाकळी ते गोधनी सिमेंट रोड हया रस्त्याच्या मधोमध येणा – या विद्युत खांबांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणे फारच वाढले आहे. हा रस्ता ६० फुटाचा आहे मात्र रस्त्याच्या मधोमध येणा-या विद्युत खांबामुळे ३० फुटाचा झाला आहे.
झिंगाबाई टाकळी ते गोधनी सिमेंट रोड बनविताना सार्वजणिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाने कोणतेही नियोजन न करता मधोमध येणारे विद्युत काढले नाही. ते काढणे वाहतुकीच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचे होते. झिंगाबाई टाकळी गोधनी बोखारा, चक्की खापा, बैलवाडा, लोनारा आणि गुमथळयाकडे येण्या जान्या करिता हाच एकमेव मार्ग आहे. तसेच भारीभरकम सामान घेवून येणारे मोठ-मोठे ट्रक सुध्दा रोड ने वाहतूक करतात. हया मार्गावर वाहनांची वर्दळ खूप मोठया प्रमाणात आहे. वाहन चालकांना वाहन चालवताना विद्युत खांबांवर आदळल्याने अपघात होण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. रस्त्याच्या कडेला असलेले स्टीट लाईट्स सुध्दा बहुतांश बंदच असतात. हयाच वर्दळीच्या रस्त्यांवर शाळेतील लहान मोठे विद्यार्थी ये-जा करीत असतात त्यामुळे त्यांच्या सुध्दा जिवाला धोका आहे. ह्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
हे सर्व काम नियोजन पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा प्रहार जनशक्ती तर्फे वार्ड अध्यक्ष विजय गावंडे, उपाध्यक्ष योगेश राऊत, सचिव दिनेश सुपरटकर, पश्चिम नागपूर अध्यक्ष अमोल इसपांडे, पश्चिम नागपूर उपाध्यक्ष प्रविणभाऊ हातमोडे, पश्चिम नागपूर कामगार अध्यक्ष आकाश ढेपे युवा अध्यक्ष चिंटू राऊत, सुरेन्द्रगड वार्ड अध्यक्ष कवेक्ष्वर राऊत नागपूर शहर अध्यक्ष राजेश बोढारे, उपाध्यक्ष नितीन गायकवाड, सागर लाडेकर, शैलेश मारशिंगे, राहुल सेन, राहुल बावने यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.