रामटेक :- ताई गोळवलकर महाविद्यालय च्या भौतिकशास्त्र विभागातर्फे नॅनोटेक्नॉलॉजी आणि नॅनोमटेरियल या विषयांवर परिसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. यात तृतीय वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
नॅनोटेक्नॉलॉजी फायदेशीर आहे की नाही , सोबतच त्या बद्दलची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश सिंगरु यांनी आजच्या काळात नॅनोटेक्नॉलॉजी चे महत्व काय आहे हे सांगितले .भौतिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ वंदना सिंगरू यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संगणक शास्त्र च्या प्राध्यापिका शीतल काटोके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
श्रद्धा मात्रे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला ग्रेसी टेंभुर्णे , इरम शेख , रश्मी आश्टनकर , अभिषेक सोणकुसरे, अंकिता चौधरी , प्राची चवाडे , झलकता महाजन , व बादल बंधाटे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.. तसेच तिलक नाईकवार व पंकज बसाखेत्रे यांनी तांत्रिक सहाय्य केले…