जानेवारी महिन्यात अनेक राज्यातील अनेक ठिकाणी विविध समारोह आयोजित करण्यात येत असतात. मात्र, नागपूर जिल्ह्यातून (Nagpur district) धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका बंद शामियानात चक्क न्यूड डान्स (Nude Dance) सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नाही तर या न्यूड डान्सचे व्हिडीओजही व्हायरल (Nude dance video goes viral) होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात गावाच्या बाहेर बंद असलेल्या शामियानात हा धक्कादायक प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूड डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या अंधारात विवस्त्र डान्स
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि कुही या तालुक्यांतील गावांत अनेक ठिकाणी डान्सच्या संदर्भात जाहिराती लावण्यात आलेल्या आहेत. रात्र होताच गावाबाहेरील बंद शामियानात हे डान्स सुरू होतात. त्यानंतर रात्रीच्या अंधारात येथे न्यूड डान्सचे खेळ सुरू होतात.
व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
धक्कादायक म्हणजे शंकरपटाच्या नावाखाली हे सर्व प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे. हे न्यूड डान्स पाहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी असल्याचंही दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
डान्सच्या कार्यक्रमात सुरुवातीला नर्तकांनी डान्स केले यावेळी काही प्रमाणात मर्यादांचे उल्लंघन झालं मात्र नंतर त्यांनी तर अखेर केली. या नर्तकांनी चक्क आपले कपडे उतरवले आणि न्यूड डान्स सुरू केला.
100 रुपये देऊन डान्स पाहण्यासाठी गर्दी
या विवस्त्र आणि न्यूड डान्सच्या संदर्भात अनेक गावांमध्ये पोस्टर्स आणि फलक लावून जाहिरात करण्यात आल्या असल्याचं बोललं जात आहे. अवघे 100 रुपये देऊन हा न्यूड डान्स पाहण्यासाठी तरुणही मोठी गर्दी करताना दिसत आहेत. याच तरुणांपैकी काहींनी न्यूड डान्स आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आणि त्याचेच काही व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत.
बॉलिवूड सिनेमांच्या गाण्यांवर तरुण-तरुणी नग्न होत डान्स करताना व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहेत. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.