बेला: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा बेलाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नुकताच बँकेत कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कांबळे तर निरीक्षक ओमप्रकाश भागवत व्यवस्थापक एन. बी .पराते, कर्मचारी निळकंठ नगराळे व अमोल धोंगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता पिक कर्ज, ,शेतीपूरक जोड धंद्यासाठी बोरवेल, पाइपलाइन विहीर पंप , इंजिन, शेतघर, तारेचे कुंपण ,बैल जोडी, दुभती जनावरे ,मळणी यंत्र, अवजारे ,गोट फार्म ,पोल्ट्री फार्म यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे .
त्याचप्रमाणे, ग्रामीण कारागिरांना व्यवसाय स्वयंरोजगार कर्ज, महिला बचत गटा करिता कर्ज पगारी नोकरदारांसाठी विविध प्रकारचे कर्ज बँकेतून मिळणार आहे. असे मार्गदर्शन कर्जवाटप मेळाव्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. मेळाव्याला आनंदराव सोनकुसरे परमानंद पादाडे, , ओमप्रकाश लामपुसे ,सुभाष तळवेकर व असंख्य शेतकरी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अमोल धोंगडे यांनी केले.