नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगारात मोठे अडथळे असताना महावितरणच्या नागपूर परिमंडलाने सामाजिक बांधिलकी जोपासत २०१ बेरोजगार अभियंत्यांना १० कोटी ३६ लाखाची कामे देत या अभियंत्यांना मोठा दिलासा दिला आहे.
विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदवीकाधारक बेरोजगार अभियंत्यांना महावितरणतर्फे १० लाख रुपयांपर्यंतची कामे विना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने देण्यात येतात.ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या पुढाकारातून महावितरणला जिल्हा विकास निधीतून भरीव निधी उपलब्ध झाला असून त्यांच्या निर्देशनानुसार नागपूर परिमंडलात बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामे वाटप करण्यात आली. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली लॉटरी काढण्यात आली. नागपूर परिमंडलातील नागपूर शहर मंडल कार्यालयाच्या वतीने बेरोजगार अभियंत्यांना ४ कोटी ९ लाखाची कामे देण्यात आली.तर नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत ११८ बेरोजगार अभियंत्यांना ६ कोटी २७ लाखाची कामे देण्यात आली.
नागपूर शहर मंडल कार्यालयाच्या वतीने कामे वाटप करताना अधीक्षक अभियंता अमित परांजपे,सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे,गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जिवतोडे,बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे, काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमराज ढोके,महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, व कार्यकारी अभियंता (प्रशासन) विनोद सोनकुसळे तसेच उपकार्यकारी अभियंता अभिजित सूर्यवंशी उपस्थित होते.
तसेच नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाची लॉटरी अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक अघाव , सावनेर विभागाच्या कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता (प्रशासन) राजेंद्र गिरी, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत तसेच उप कार्यकारी अभियंता किशोर चौरागडे उपस्थित होते.