Advertisement
नागपूर : गानसाम्राझी भारतररत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच राज्यपाल भगत सिंग कोश्यारी तातडीने मुंबईला रवाना झाले. आपल्या नियोजित दुपारच्या वेळेत बदल करत पावणे बारा वाजता त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले.
राज्यपाल गेल्या 4 फेब्रुवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. आज 6 फेबुवारीला नियोजित 3 वाजता ते मुंबईला प्रयाण करणार होते. तथापि, लतादीदींच्या निधनाची दु:खद बातमी ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या दौऱ्यामध्ये बदल करत पावणे बारा वाजता मुंबईकडे प्रयाण केले.
विमानतळावर त्यांना निरोप देण्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा, जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त लोहित मटानी, पोलीस अधीक्षक ग्रामीण विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.