Published On : Wed, Feb 23rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

कामठी नगर पालिकेच्या निवडणुका मे महिन्यात होणार;

Advertisement

प्रभाग रचनेचे काम सुरू

कामठी :-तालुजादर्जा प्राप्त कामठी नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ नुकताच संपला असून कामठी नगर परिषद मध्ये 12 फेब्रुवारी पासून प्रशासक राज सुरू झाले आहे.तेव्हा निवडणुकीचा बिगुल केव्हा वाजणार, या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना प्रभाग रचना जाहिर होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती या उत्सुकतेला आता विराम मिळाला असून नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने काल 22 फेब्रुवारी ला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला यानुसार कामठी नगर परिषद चो होणारी सार्वत्रिक निवडणूक ही मे महिन्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Today’s Rate
Thursday 03 Oct. 2024
Gold 24 KT 76,100 /-
Gold 22 KT 70,800 /-
Silver / Kg 92,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निवडणुकांमध्ये दिले जाणारे इतर मागासवर्गीय उमेदवारांचे आरक्षण न्यायालयाच्या एका निर्णयामुळे रद्द झाले होते .या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात निवाडा सुरू असताना काही नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्या.या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण दिले गेले नव्हते .मात्र नगर परिषद चा पंचवार्षिक कार्यकाळ संपला असून त्याठिकानो प्रशासक राज सुरू झाले या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानुसार 2 मार्च पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कडे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Advertisement

या प्रस्तावात एकूण प्रभाग संख्या , प्रभागातील जातीनिहाय लोकसंख्या, प्रभागाचे सीमांकन व नकाशा निश्चित केला जाणार आहे.या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी 7 मार्च पर्यंत मंजुरी द्यावयाची आहे.7 ते 10 मार्च दरम्यान प्रस्तावित प्रभाग रचना विविध माध्यमाद्वारे प्रसिद्ध केली जाणार असून या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या हरकती व सूचना 10 मार्च पासून ते 17 मार्च पर्यंत स्वीकारल्या जातील.22 मार्च पर्यंत जिल्हाधिकारी या हरकती व सूचनांवर निर्णय देणार आहेत व याच अनुषंगाने 25 मार्च पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे.यानंतर 1 एप्रिल पर्यंत मान्यता मिळणार आहे.5 एप्रिल पर्यंत निवडणूक आयोगाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर 30 ते 45 दिवसाच्या आत या निवडणुका होतील असे अपेक्षित आहे.शासनाने ठरविलेल्या कार्यक्रमानुसार सर्व व्यवस्थित होत गेले तर मे महिन्यात या निवडणुका पूर्ण होतील असे अपेक्षित आहे.
बॉक्स-ओबीसी आरक्षणाबाबत अनिश्चितता

—ओबीसी आरक्षणासाठी आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी आगामी नगर परिषद निवडणूक मध्ये हे आरक्षण असेल की नाही याबाबत तूर्तास अनिश्चितता आहे.ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळेल असे जाणकारांचे मत आहे.
बॉक्स-असा असेल कार्यक्रम
—@प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे-2 मार्च पर्यंत
—@प्रारूप प्रभाग रचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता–7मार्च पर्यंत
—@प्रभाग रचना प्रसिद्ध करने-10मार्च पर्यंत
—@प्रस्तावित प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे -17मार्च पर्यंत
—@हरकती व सूचनांवर जोल्हाधिकाऱ्यानी निर्णय देणे -22 मार्च पर्यंत
—-@हरकती व सूचनांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविणे -25मार्च पर्यंत
—@अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे–1एप्रिल
—@अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे 5 एप्रिल.