मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन, नागपूर ही नाट्य संस्था मागील ८ वर्षापासून नागपूरात नाटक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे. संस्थेतील रंगकर्मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे स्नातक असून गहन नाट्य अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून नाट्य क्षेत्राविषयी आवड असलेल्या स्थानिक युवा कलावंतांना नाट्यक्षेत्रात रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत .
सोबतच युवा रंगकर्मींना नाट्यकलेची ओळख, नाट्यलेखन, दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा, नैपथ्य, संगीत संयोजन, प्रकाश योजना इत्यादी विषयांचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे . या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक कलावंतांना राष्ट्रीय स्तरावरील नाट्य गतिविधि, नाटकाविषयी चे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन नाट्यकलेचा प्रसार व प्रचार करणे हा असतो .
उद्या दिनांक ०६ मार्च २०२२ रोज रविवार ला सायंकाळी ०६:०० वाजता मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन, नागपूर तर्फे ‘ विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती नागपूर’ च्या सभागृहात , साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर लिखित आणि पुष्पक म . भट दिग्दर्शित दोन अंकी मराठी नाटक “तू वेडा कुंभार” याचे सादरीकरण करण्यात येणार आहे .फक्त ३० प्रेक्षकांना निशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे . नाटकाचा आस्वाद घेण्याकरिता नाट्य रसिकांना मेराकी थिएटरे तर्फे आमंत्रित करण्यात येत आहे .
कार्यक्रम स्थळ :- विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती नागपूर’ चे सभागृह , रामदासपेठ , नागपूर -१०
वेळ :- सायं ०६:०० वाजता ; संपर्क :- ८६०००४४४३२ .