Published On : Mon, Mar 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महावितरणच्या कृषी योजनेत अडीच लाख भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार

Advertisement

नागपूर : शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करून त्यांचे वीज बिल कोरे करणाऱ्या महावितरणच्या महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरणात उमरेड विभाग अंतर्गत कुही उपविभागातील वीज बिलाचे २ लाख ४९ हजार रुपये भरणाऱ्या तेरा शेतकऱ्यांचा प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी गंगाराम भोयर,अमृत भिवगडे,बळीराम वैद्य,लटारू सोनसारे,कांथिराम वैद्य,मोरेश्वर सोनसारे,बिरबल बोरकर,आर.एल.वैद्य,पुंजाराम रंधाई,प्रभाकर राऊत,विनोद भुजाडे व अशोक तेलंगे या तेरा शेतकऱ्यांनी त्यांच्या कडील वीज बिलाच्या थकबाकी असलेल्या रकमेचा भरणा केला ही संपूर्ण रक्कम २ लाख ४९ हजार ४८० एवढी होती. त्यानिमित्त नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी व नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Today’s Rate
Sat 16 Nov. 2024
Gold 24 KT 74,500 /-
Gold 22 KT 769,300 /-
Silver / Kg 89,300/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे तसेच उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोळ प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement