नागपूर : महिलांमध्ये वाहतूक व इतर सामाजिक विषयांबाबत जनजागृती करण्याबाबत ‘ ‘सावित्री पथकां’ची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकाचे उद्घाटन महिला दिना निमित्त उद्या 8 मार्च रोजी नागपूर येथे सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त नागपूर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली.
या उपक्रमात कैाटुंबिक हिंसाचार, सार्वजनिक समस्या, शिक्षण विषयक समस्या, आरोग्य विषयक समस्या, महिला सुरक्षितता अशा विषयांच्या संबंधित अडचणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
या सावित्री पथकात तिन अधिकारी व कर्मचारी असतील. हे पथक नागपूर जिल्ह्यात मॉल, मार्केट, शाळांना, सरकारी कार्यालये, वसाहती येथे आठवड्यातून एकदा भेट देऊन महिला वाहन चालकांचे प्रबोधन करेल.
याच प्रमाणे महिन्यातून एकदा महिलांसाठी प्रादेशिक कार्यालयात रस्ता सुरक्षा बाबत ‘लाईव्ह शो’ दाखविण्यात येईल महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग आहे.