कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस एक कि मी अंतरावरील पांधन रोड ओम बुक डेपो जवळ चार आ रोपीने जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून युवका स चाकुने मारून गंभीर दुखापत करित गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून चारही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.११) मार्च ला रात्री ८:४५ ते ९:१५ वाजता दरम्यान रितीक नेपाल गजभिये वय २३ वर्ष राह. वार्ड क्र १ गोंडेगाव हा टाटा एस चारचाकी गाडी क्र. एम एच ४० बी एल ८५९१ ने भरगच्छ लोकवस्ती मधिल पांधन रोडवरील ओम बुक डेपो जवळ उभी केली असता आरोपी १) गज्जु व त्या सोबत अन्य तीन आरोपी हे स्पेलंडर दुचाकी वाहनाने येवुन जुन्या डिजे वाजविण्याचा कारणावरून चार आ रोपीतांनी संगमत करून ” यहा है ओ” म्हणत अश्लिल भाषेत शिवीगाळ करित आरोपीतांनी स्वत:हा जवळी ल चाकुने रितीक नेपाल गजभिये याच्या पुठ्ठ्यावर (ढुगणावर), डोक्याचा मध्य भागी व नाका वर चाकुने मारून गंभीर दुखापत करित जख्मी केले.
घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटना स्थळी पोहचुन जख्मी युवकाला प्रथमोपचारास प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरांनी तपासुन प्रकृती गंभीर असल्याने नागपुर शासकीय रुग्णालयात रवाना केले. कन्हान पोलीसांनी घटना स्थळाचा पंतनामा करून फिर्यादी रितीक गजभिये यांच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी गज्जु व इतर तीन असे चार आरोपी विरुद्ध कलम ३०७, २९४ , ३४, ४, २५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोस्टे चे पोउप निरिक्षक सतिश मेश्राम हे करीत आहे.