४ स्तरीय वाहतुक व्यवस्थेचे निर्माण कार्य अंतिम टप्यात
नागपूर : तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम (गुरुद्वारा) येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महा मेट्रो निर्माण करत असून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी गड्डीगोदाम येथील निर्माण कार्याची पाहणी करत उर्वरित निर्माण कार्य लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात जेणेकरून सदर मेट्रो मार्गिका,उड्डाणपूल आणि विद्यमान रस्ता नागरिकांन करता खुला होऊ शकेल.
डॉ. दीक्षित यांनी निर्माण कार्य स्थळी अधिकारी व कामगारांशी संवाद साधत निर्माणाधीन कठीण कार्याकरिता प्रेरित केले. उल्लेखनीय आहे कि, कामठी मार्गावरील गड्डीगोदाम या ठिकाणी भारतातले शहरी भागातील सगळ्यात मोठे डबल डेकर गर्डर विशालकाय लोखंडी स्ट्रकचर आहे.
देशात पहिल्यांदाच मोठे आणि जड अशी ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था निर्माण केल्या जात असून सदर निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्तअश्या रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी(RuB) येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे .
महा मेट्रोच्या वतीने निर्माण कार्य स्थळी कर्मचाऱयांना प्रोत्साहित करत मेगाफोनच्या साह्याने सतत दिशा निर्देश सूचना दिल्या जात आहे. भारतीय रेल्वेचे संचालन होत असतांना योग्य खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहे. जमिनीपासून २४ मीटर उंच अश्या ठिकाणी आव्हानत्मक कार्य महा मेट्रोच्या वतीने पूर्ण केल्या जात आहे. या निर्माण कार्य स्थळी सुमारे २०० अधिकारी,कर्मचारी, इंजिनियर व कामगार २४ X ७ कार्य करत आहे. महा मेट्रोने निर्माण कार्यादरम्यान अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड स्थापित केले असून या रेकॉर्डची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याकरीता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यावेळी महा मेट्रोचे संचालक (महेश कुमार), संचालक (रोलिंग स्टॉक व सिस्टम) श्री. सुनील माथूर,संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री. अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प प्रबंधक (रिच २) श्री.प्रकाश मुदलियार,कार्यकारी संचालक श्री. राजेश पाटील, श्री. गिरधारी पौंनीकर इतर मेट्रो अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.