-गुजरवाडीतील आरोग्य तपासणी व खासदार हेल्थ कार्ड वाटप शिबिराचा हजारोंनी घेतला लाभ
-भाजप अनुसूचित जाती मोर्चा व जय युवक क्रांन्ती दलाचा उपक्रम
बदललेल्या जीवनशैलीमुळेही शरीरात विविध आजार घर करीत आहेत. निरोगी जीवन जगायचे असेल तर प्रत्येकांनी आपल्या शरिराची काळजी घेणे अत्यावक्षक आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक विकासासोबतच प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहणार, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी केले. नागपूर शहर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि जय युवक क्रांन्ती दलातर्फे तसेच श्रीकृष्ण रुग्णालय व क्रिटीकल केअर सेंटर, धंतोलीच्या सहकार्याने रविवारी गुजरवाडी-शनिवारी परिसरातील शाल्वतरू शाक्य सिंह बुद्ध विहारातील पटांगणात आयोजित निःशुल्क रोगनिदान व आरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक श्रीकृष्ण रुग्णालय व क्रिटीकल केअर सेंटरचे डाॅ. महेश फुलवानी, प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम नागपूरचे अध्यक्ष किशोर वानखेडे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष राजेश हातीबेड, शिबिराचे आयोजक तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर उपाध्यक्ष व जय युवक क्रांन्ती दलाचे अध्यक्ष संदीप माने यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथींमध्ये डाॅ. ललित खंडवानी, डाॅ. रविराज परदेसी, डाॅ. पूजा फुलवानी, दंत चिकित्सक डाॅ. प्रमाक्षी बेले, लॅन्सी कोरीया यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या उद्घाटनानंतर करण्यात आली. यानंतर शिबिराचे आयोजक व स्वागताध्यक्ष संदीप माने यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर उपाध्यक्ष व जय युवक क्रांन्ती दलातर्फे आयोजित विविध शिबिरामध्ये 1800 ई-श्रम कार्ड, 90 खासदार हेल्थ कार्ड तसेच 90 कोविड युनिर्वसल पासचे वाटप गुजरवाडी-शनिवारी, इमामवाडा, गणेशपेठ, बारासिग्नल, बोरकरनगर, उंटखाना, कर्नलबाग, गाडीखाना, चांडक ले-आऊट परिसरातील नागरिकांनी घेतला.
यावेळी किशोर वानखेडे बोलतांना म्हणाले की, आपल्या देशात सर्वाधिक पैसा हा आरोग्यावर खर्च होतो. शहरातील अपाले लोकप्रिय नेते तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरातील जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यास वरदान ठरणारे खासदार हेल्थ कार्ड आरोग्य सुविधेचा लाभ घेतला तर आरोग्यावर होणारा खर्च कमी होणार. तसेच जर प्रत्येकांने आपल्यासह कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य जपले, तसेच आपल्यासह सर्वांची काळजी वेळोवेळी घेतली. तर आपले कुटूंब हे हसत राहणार. आणि आरोग्यासाठी लागणारा पैसाही वाचेल असेही किशोर वानखेडे यावेळी म्हणाले. रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत पार पडलेल्या या शिबीरामध्ये हृयविकार तपासणी, अस्थी रोग तपासणी, मस्तिष्क तपासणी, डेंटल तपासणी, नाक, कान, व घसा तपासणी, नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, बिपी माॅनेटरिंग, ई.सी.जी तपासणी व निःशुल्क औषध वितरणचा परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती शिबिराचे आयोजक तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर शहर उपाध्यक्ष व जय युवक क्रांन्ती दलाचे अध्यक्ष संदीप माने यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन विष्णू गोयंका यांनी तर आभार संदीप माने यांनी मानले.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी मंगला पटेल, अनिता शर्मा, वंदना माने, विभा सावंत, अल्का तायडे, विजया माने, रूपाली माने, अतुल माने, सूरज बांते, राजेश ढगे, चेतन माने, राजेश सोनटक्के, राजेश जाधव, सुरेंद्र लोहे, जितेंद्र वाघ, विनोद बोरकर, सुनिल नागमोते, गिरीश तिजारे, राकेश भोयर, निखिल कांबळे, शुभम जाधव स्पप्नील पाटील, विप्लव कांबळेसह नागपूर शहर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि जय युवक क्रांन्ती दलातील पदाधिकाऱ्यासह कार्यकत्यांचे सहकार्य लाभले.