Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरूवारी (२४ मार्च) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४५८१४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. २,१२,६६,०००/- चा दंड वसूल केला आहे.
गुरूवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे हनुमाननगर झोन अंतर्गत २, गांधीबाग झोन अंतर्गत २ आणि मंगलवारी झोन अंतर्गत २ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.