श्री राम नवमी च्या दिवशी दुर्दैवी घटना
कामठी:-आज श्री राम नवमी च्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना काळाने घेतलेल्या झडपेत कामठी तालुक्यातील सेलू गावातील एक 14 वर्षीय मुलगा कन्हान नदी च्या झुल्लर पात्रात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजता घडली असून मृतकाचे नाव स्वप्नील दिलीप ढोबळे वय 14 वर्षे रा सेलू ता कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक हा वडोदा गावातील गांधी विद्यालयातील 9 व्या वर्गातील विद्यार्थी असून आज सुट्टीचा दिवस असून श्री राम नवमी चा उत्साह असल्याने नदीवर आंघोळ करून उत्साह पूर्ण वातावरणात श्री राम नवमी साजरा करू अशा बेतात गावाजवळील कन्हान नदी च्या झुल्लर पात्रातील ढोल्यात आंघोळीला गेले आणि डोहात बुडाल्याने सदर मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सर्वांनी एकच धाव घेत मृतक तरुणाला ढोल्या बाहेर काढण्यात यश गाठले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतक मुलाच्या पाठीमागे आई, वडील व दोन बहीण असा आप्तपरिवार आहे.मात्र आजच्या उत्सवाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने सेलू गावात शोककळा पसरली आहे.