कन्हान : – ग्राम पंचायत येसंबा येथे राष्ट्रसंत तुकडो जी महाराज यांची ११३ वी जयंती विविध कार्यक्रमाने ग्रामजयंती म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.
शनिवार (दि.३०) एप्रिल २०२२ ला ग्राम पंचायत येसंबा येथे ग्राम गितेतुन लोकांना उपदेश देणारे, राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची ११३ वी जयंती ग्राम जयंती येसंबा सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसं गी प्रामुख्याने उपस्थित सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी, अधिकारी व कर्मचा-यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले.
विविध कार्यक्रमाने ग्राम जयंती थाटात साजरी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका मायाताई चकोले, आशावर्कर सुषमाताई गजभिये, अंगणवाडी मदतनिस कांताताई गजभिये, रमेशजी हारोडे, पवन हारोडे, हंसराज घरजाळे, संजय गजभिये सह बाल गोपाल आणि नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.