राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेऊन अनेक युवा नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
आम आदमी पार्टीच्या कामाला प्रेरित होऊन 32 पेक्ष्या अधिक संख्येने नवीन सदस्याचा पक्ष प्रवेश करून येत्या मनपा निवडणुकीत आपचा दणदणीत विजयी करून भ्रष्टाचार मुक्त व प्रामाणिक व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प घेऊन “आपचा महापौर 2022” अभियान राबविण्यात आले.
नागपूर शहर विधानसभा क्षेत्र पूर्व नागपूर, प्रभाग 28 चे कमलेश जी जरित यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांचा मंगळवार दिनांक 14/06/2022 ला अंतुजी नगर येथे पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष श्री. नामदेव कामडी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पक्षाचे उच्चपदस्थ प्रमुखांच्या उपस्थिती मध्ये पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने शहर सचिव भूषण ढाकुलकर, पूर्व विधानसभा सचिव धिरज आगाशे, विधानसभा कोषाध्यक्ष मोहन मांगर, संगठन मंत्री सोनू फटिंग, विधानसभा युवा अध्यक्ष हेमंत पांडे, प्रकाश जवादे, सोनू खड्गी, सलाम वारसी, दीपक गायकवाड़ इत्यादी उपस्थित होते.