उत्तर आणि पूर्व नागपूर: आशी नगर झोन , नेहरू नगर झोन , सतरंजीपूरा झोन आणि लकडगंज झोन मधील २८ जलकुंभाचा पाणीपुरवठा विस्कळीत
खबरदारीचा उपाय
DCIM100MEDIADJI_0084.JPG
नागपूर : गेल्या काही दिवसापासून नागपूर शहरात जरी पावसाची संततधार सुरु आहे तरीही उत्तर आणि पूर्व नागपुरातील रहिवासी अर्थात आशी नगर झोन, लकडगंज झोन, नेहरू नगर झोन आणि सतरंजीपूरा झोन मधील जवळपास २८ जलकुंभ क्षेत्रातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे . ह्याला कारण म्हणजे कन्हान नदी मध्ये मोठ्या प्रमाणात मिसळलेली हानिकारक “फ्लाय ऐश” आणि त्यामुळे नागपूर महानगर पालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ला जबरदस्तीने बंद करावा लागत असलेला कन्हान जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याचे पम्पिंग युनिट हेच होय.
गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे कन्हान नदी ची फक्त पातळी च वाढलेली नाही तर ती दुथडी भरून वाहत आहे. पण मोठ्या प्रमाणात “फ्लाय ऐश” ह्या नदी पत्रात मिसळल्यामुळे ह्या पाण्याचा रंग संपूर्णपणे राखाडी झालेला आहे. ही “फ्लाय ऐश” खापरखेडा थर्मल पावर स्टेशन च्या फ्लाय ऐश” च्या तलावातून कन्हान नदी मध्ये मिसळत असल्याचा दाट संशय आहे . नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ची चमू ह्या सर्व बाबीवर लक्ष ठेवून आहे .
खरे तर चमूच्या जागृकतेमुळेच गेल्या १० जुलै रोजी पहाटे चमू ला जशी राखड पाण्यावर वाहत येताना दिसली तसेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे पंप लगेच बंद करण्यात आले . जेवढे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात गेले होते ते संपूर्णपणे बाहेर काढण्यात आले आणि केंद्राची देखील साफ सफाई करण्यात आली. तेव्हापासून (गेल्या १० जुलै ) राख हि दररोज नदीच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात वाहून येत आहे परंतु हे राखयुक्त हानिकारक पाणी शहरात लोकांच्या घरी जाऊ नये लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये … याकरिताच वारंवार कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात येत आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे .
१० जुलै पासून उत्तर आणि पूर्व नागपुरात कमी दाबाचा आणि मर्यादित पाणी पुरवठा होत होता परंतु १४ जुलै पासून तर पाणीपुरवठा झालाच नाही ह्याला कारण म्हणजे खबरदारी चा उपाय म्हणून बंद करण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्राचे पम्पिंग, ज्यायोगे राख युक्त हानिकारक पाणी लोकांपर्यंत पोहोचू नये. तसे पहिले असता कुठलाही जलशुद्धीकरण केंद्र हा फ्लाय ऐश युक्त ला शुद्ध करू शकत नाही किंवा त्याला तसे करण्यासाठी निर्माण केले जात नाही. कन्हान जलशुद्धीकरण केंद्र जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वर आधारित असे केंद्र जरी असले तरीही ते फ्लाय ऐश युक्त पाणी शुद्ध करू शंकत नाही ते हि तेवढेच खरे आहे.
ह्याबाबतीत कालच नागपूर महानगर पालिका आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अधिकाऱ्याची बैठक ED, NESL Ms Shweta Banerjee ह्यांच्या कार्यालयात झाली असून खापरखेडा अधिकाऱ्यांनी ह्याबाबतीत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसेच महानगर पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आज महानगर पालिका , ऑरेंज सिटी वॉटर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ आणि खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी झाली आहे.
पण हि बाब हि तेवढीच खरी आहे कि ह्या सर्व प्रकारामुळे उत्तर आणि पूर्व नागपूरची नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पण नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे राखयुक्त हानिकारक पाणी पिण्यापासून बचावले आहेत.
या प्रकारामूले खालील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा विस्कळी झालेला आहे ; आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग , सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग, नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ, लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ
यादरम्यान जवळपास लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित झालेला असून आहे., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर करून सहकार्य करावे.