नागपूर: दिनांक २१.०७.२०१२ रोजी नागपूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा वकील संघटना (डी. बी.ए) तसेच “स्वराज्य अधिवक्ता न्यायीक सेवा संघटने जिल्हाधिकारी कार्यालयात खटले चालवित असलेले समस्त वकील ज्यांचे दिवाणी स्वरूपाचे खटले मा. जिल्हाधिकारी, नागपूर येथील कार्यालयात प्रलंबित आहे.
तसेच ते खटले चालविण्याकरीता खटल्यांच्या सुनावणीची वेळ निश्चित करने व जिल्हाधिकारी कार्यालयात वकीलांचा टाटकळत न ठेवता त्यांची सुनावणी त्वरीत होणे तसेच पूर्ण वेळ देणारे पिठासीन अधिकारी नेमणे व नागपूर जिल्हयातील तसेच इतर बाहेर गावावरून येणा-या वकीलांची गैरसोय टाळण्याकरीता त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वकीलांची खटले वेळेवर होत नसल्याने त्यांचे मा. उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ तसेच जिल्हा न्यायालय व ग्राहक मंच आणि कामगार न्यायालयातील संपूर्ण कामे विस्कळीत होतात.
त्यामुळे सदर निवेदन हे मा. उप जिल्हाधिकारी श्रीमती बनकर मॅडम यांना “नागपूर जिल्हा वकील संघटना (डी. बी.ए.) तसेच “खराज्य अधिवक्ता न्यायिक सेना ” यांचे वतीने निवेदन सादर करण्यात आले.
सदर वेळी उपस्थित असलेले वकील जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड कमल सतुजा तसेच सचिव अॅड. नितीन देशमुख, “स्वराज्य अधिवक्ता न्यायीक सेवा” अध्यक्ष अॅड. नितिमकुमार रुडे, तसेच सचिव अॅड, तरूण परमार व अॅड गणिष रणदिवे, अँड निकोसे, अॅड. उमाशंकर अग्रवाल, अॅड. मंगेश भावलकर, अॅड. सचिन जबखान, अॅड. विनोद खोबरे, अॅड. सौरभ राऊत, अॅड, भुपेश चव्हाण, अॅड. अभियान बाराहाते, अॅड. स्मिता गंगावणे. अँड ताबीर शेख, अॅड. प्रतिक लोहंबरे, अँड. वासुदेव कापसे, अॅड. अनिल कावरे, अॅड. रूबी सिंग, अॅड. निखिल भौतिक, ऑड प्रियंका दुबे, अॅड. दिपा ढोके, अॅड. संचिता दो तथा कुल परमार हे उपस्थित होते.