– राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यपाल कोशारी तात्यांना पाठविले Get Well Soon चे टपालाने पत्र,राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीण च्या वतीने राज्यपालांना पाठविण्यात आले १० हजार पत्र
नागपुर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीण च्या वतीने शहर अध्यक्ष शैलेंद्र तिवारी आणि नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांचा संयुक्त नेतृत्वात महाराष्ट्राला अवमानित करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोशारी यांना Get Well Soon कोशारी तात्या चे पत्र टपालाने पाठवुन जाहीर निषेध करण्यात आले. राज्यपाल हे मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्या वर अवैध टिका टिपणी करून महाराष्ट्राचा अपमान करण्याचा काम करत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर शहराचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी म्हणाले की भगत सिंग कोशारी हे राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे की गुजरात चे राज्यपाल आहे राज्यपाल हे कधीही बोलतांना त्या मध्ये महाराष्ट्राला अपमानित करून वक्तव्य करीत असता आता नुकताच काही दिवसा आधी भगत सिंग कोशारी यांनी वक्तव्य केले की जर मुंबई मधून गुजराती लोक निघुन गेले तर मुंबईत पैसे नाही राहणार अश्या भाषेत विधान व्यक्त केले आहे. आता महाराष्ट्राच्या संपुर्ण जनतेच्या मनात असं प्रश्न निर्माण झालेला आहे की भगत सिंग कोशारी यांनी राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेतांना महाराष्ट्राला समोर नेण्याचा हेतूने शपथ घेतली आहे की अपमान करण्या करीता? राज्यपाल हे समानजणीक पदावर बसलेले आहेत.
महाराष्ट्राचा अपमान केल्यामुळे महाराष्ट्राच्या जनते मध्ये रोष आलेला आहे म्हणून आज राज्यपालाच्या निषेधार्थ त्यांना पत्रा द्वारे सुचित करण्यात येत आहे की जर महाराष्ट्राचा आणि मुंबईचा यानंतर द्वेष करायचा असेल तर हे महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोडून आपण दिल्ली राजस्थान किंवा गुजरातला जावे. राज्यपालांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेशी माफी मांगावी अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस भगत सिंग कोशारी यांचा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आसं आव्हान करण्यात आले.
यावेळी अमित पिचकाटे, दिनेश साळवे, अनिल बोकडे, राहुल पांडे, प्रणय जांभुलकर, दिनेश कालबांडे, तुषार भाटी, प्रशांत बसिने, उमेश पाटणकर, प्रभाकर घोराडकर, आयुष लोणारे, निशांत निमजे, सुमित बसिने, सुशील ढोलेकर, विश्वजीत सावडिया, सुमित बोडखे, पंकज नंदनवार, कपिल वानखेडे, रितेश उमाटे, शुभम कोंढलकर, संदीप नेहारे, शब्बीर मिर्झा, रोशन खोड, मो.दानिष सिध्दकी, परिशीत वानखेडे, अनुप डाखळे, सुनिल नानावेई, अविनाश बांगर, आकाश चिमणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.