नागपुर – दक्षिण नागपुरात मानेवाडा रोड, ज्ञानेश्वर नगर, न्यू कैलास नगर, बालाजी नगर, प्रगती नगर, इंदिरा कॉलनी, ईश्वर नगर, नालंदा नगर व भगवान नगर टी पॉईंट या परिसरात नुकतीच तीन फूट व्यास असलेली नवीन वाटर लाईन डांबरी रोडच्या मधून टाकण्यात आली. ते रस्ते सिमेंट चे बनल्यावर समस्या वाढेल.
ही वाटर लाईन सिमेंट रोड बनलेला नाही त्या डांबरी रोडच्या अगदी मधुन टाकण्यात आली. त्यामुळे या वस्तीतील मुख्य रस्ता हा संपूर्ण खराब झाला. ठेकेदाराने थातूर-मातूर त्यावर सिमेंट टाकुन बुजविण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी तर अजून बुजवले सुद्धा नाहीत.
हे काम करीत असताना काम पाहणारे ठेकेदार विजय तिलेकर यांनी जेसीबीच्या माध्यमाने ज्ञानेश्वर नगर येथील मनपाच्या सार्वजनिक खुर्च्यांची व घरमालक योगेश ढाकणे यांच्या मार्बलची तोडफोड केली. तसेच त्यांचे घरासमोरील रोडवरील खड्डा मागील चार महिन्यापासून तसाच ठेवला. याची लेखी तक्रार घरमालक व नागरिक योगेश ढाकणे यांनी 28 जुलै ला सर्व संबंधीताकडे केली.
बसपा नेते उत्तम शेवडे यांना मिळालेल्या तक्रारीवरून त्यांनी या परिसराची व वाटर लाईन टाकणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नागरिकांना त्रासदायक असलेले निदर्शनात आले. त्याची सूचना मनपा आयुक्तांना दिली आहे.
उत्तम शेवडे यांनी महत्वाचा एक प्रश्न उपस्थित केला की सर्वसामान्य नागरिक नळ जोडणी करण्यासाठी मनपाकडे अर्ज करतो तेव्हा त्यांच्याकडून रोड कटिंग च्या नावाखाली हजारावर रुपये घेतले जातात. आता या वॉटरवर्क च्या ठेकेदाराने एक किलोमीटरचा संपूर्ण डांबरी रोडच खोदून काढला. त्याच्याकडून मनपा ने किती पैसे वसूल केले व त्याने किती पैसे मनपाकडे जमा केले याची माहिती मिळावी अशी मागणी केली आहे. कारण मनपा शेवटी नागरिका कडूनच टॅक्स रूपाने हा खर्च वसूल करीत असते.
बसपा नेते शेवडे यांनी त्या रस्त्याच्या कामाची वरिष्ठाकडून संपूर्ण सखोल चौकशी करून ते संपूर्ण काम व्यवस्थित करण्याची व तोपर्यंत ठेकेदाराचे बिल थांबवण्याची व त्याला काड्या यादीत टाकण्याची मागणी केली. या संबंधित ठेकेदाराच्या तक्रारी 28 जुलैला सर्व संबंधित विभागाकडे करण्यात आली.