Published On : Sat, Aug 13th, 2022
By Nagpur Today Nagpur News

तिरंगा बाईक रॅलीला मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

– स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : मनपा मुख्यालय ते नगर भवनपर्यंत रॅली

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातून शुक्रवारी (ता.१२) तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीला नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी (ता.१२) सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरातून रॅलीला सुरूवात झाली व महाल येथील रघुजी राजे भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे रॅलीचे समापन झाले. रॅलीत महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दुचाकी चालवित रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी मनपातील महिला कर्मचा-यांनी आयुक्तांसह अधिका-यांचे औंक्षण करून स्वागत केले. अग्निशमन विभागाच्या पथकाने बाईक रॅलीचे नेतृत्व केले. बाईक रॅलीमध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. दीपक कुमार मीना, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, मुख्य अभियंता श्री. प्रदीप खवसे, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, सहायक आयुक्त श्री. अशोक पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, तेजेंदिर सिंह रेणु, प्रशून चक्रवर्ती तसेच मनपाचे कर्मचारी आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, नागपूर मनपातर्फे आजादीचा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जात आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्वांनी आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावावयाचा आहे. नागरिकांनी या अभियानात उत्साहाने सामिल होण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

मनपा मुख्यालयातून सुरू झालेली बाईक रॅली, लिबर्टी टॉकीज चौक, छावणी चौक, बैरामजी टाऊन, पागलखाना चौक, पोलीस तलावापासून डावीकडे, जुना काटोल नाका चौक, जापनीज गार्डन चौक, लेडिज क्लब चौक, जी.एस. कॉलेज चौक, शंकरनगर चौक, झाशी राणी चौक, लोहापूल नवीन अंडर पास पासून उजवीकडे, मोक्षधाम चौक, अशोक चौक, रेशीमबाग चौक, जगनाडे चौकातून डावीकडे, गंगाबाई घाट चौकातून डावीकडे, नटराज टॉकीज चौक या मार्गे मनपा नगर भव्न, महाल (टाऊन हॉल) येथे पोहोचली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Advertisement