नागपुर – दक्षिण भारतातील नारायणा गुरु यांची 166 वी जयंती नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने मान्यवर कांशीराम मार्गावरील प्रदेश मुख्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बसपा नेत्यांनी सांगितले की भारतात केरळ हे शिक्षणाच्या बाबतीत सर्वात प्रगतीशील राज्य आहे. याचे संपूर्ण श्रेय प्रामुख्याने नारायणा गुरु यांना जाते.
नारायणा गुरु यांनी बुद्धाचा मानवतावादी व विज्ञानवादी दृष्टिकोन पुढे ठेवून विविध जाती-धर्मात बंधुभाव वाढवण्याचे कठीण कार्य दिडशे वर्षांपूर्वी केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपाचे महासचिव नागोराव जयकर, प्रमुख अतिथी प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी, सूत्रसंचालन जिल्हा सचिव डॉ शितल नाईक यांनी तर कार्यक्रमाचा समारोप उत्तर नागपूरचे उपाध्यक्ष तरुण साखरे यांनी केला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सनी मून, सागर लोखंडे, वीरेंद्र कापसे, प्रवीण पाटील, जितेंद्र मेश्राम, ओपुल तामगाडगे, मयूर पानतावणे, बाळू मेश्राम, विशाल बनसोड, रामराव निकाळजे, शेखर चहांदे, गजानन पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.