– २२ जुगार खेळणा-याना पकडुन तासपत्ते, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन सह २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांनी जुगार अड्ड यावर धाड मारून २२ जुगार खेळणा-याना ताब्यात घेऊन नगदी रूपये, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन व जुगाराचे इतर साहित्य सह एकु ण २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे कन्हान ला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांना स्वाधिन केले.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२४) ऑगस्ट ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक कन्हान उपविभागात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करि त असतांना गुप्त माहिती मिळाली की सत्रापुर रेल्वे फाटक जवळ एका घरात काही इसम हे तासपत्त्यावर पैशांची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळ खेळत आहे. अश्या विश्वसनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी बुधवार सकाळी १०.२३ वाजता दरम्यान सत्रापुर येथे एका घरात सापळा रचुन जुगार अड्डयावर धाड मारली असता एकुण २४ जुगारी इसम नामे
१) अंकित गजानन पाटे रा.पार्वती नगर नागपुर ,
२) सौरभ ओमप्रकाश गौर रा. संत्रा मार्केट नागपुर,
३ ) राजेश रामचंद्र नंदनवार रा. गोळीबार चौक नागपुर,
४ ) सलमान हारून खान रा. मिनीमाता नगर कळमना नागपुर,
५) संतोष विनायक वेलतुरकर रा. टेलीफोन एक्सचेंज चौक नागपुर,
६) स्वप्नील मनोज समर्थ रा. केडी के कॉलेज जवळ नागपुर,
७) भावेश नानक खंडवानी रा. मेओ हॉस्पीटल नागपुर,
८) संतोष बंसी लाल निभरे रा. लालगंज खैरीपुरा नागपुर,
९) साखीर गफर शेख रा. मोमीनपुरा नागपुर,
१०) आशिश शंकर रामटेके रा. शिवाजी नगर नागपुर,
११) राजीद गफर शेख रा. गिट्टी खदान नागपुर,
१२) सम्मी खान बहादुर खान रा. कुभारपुरा नागपुर,
१३) आकाश दशरथ खापेकर रा. जुनी मंगलवारी नागपुर,
१४) आकाश जयचंद गुप्ता रा. शांतीनगर नागपुर,
१५) ईवान अन्ना राउत पोलीस लाईन नागपुर,
१६) अनिकेत विरेंद्र खडसे रा. सत्रापुर कन्हान,
१७) दुर्गेश अनिल वैद्य रा. दिघोरी नागपुर,
१८) जितेंद्र परसराम टकरानी रा. जरी पटका नागपुर,१९) किरण विरू खडसे रा. कन्हान,
२०) अशोक रामचंद्र सिसकर रा. पाचपावली नागपुर,
२१) शेख वसीम शेख अखील रा. पारडी नागपुर,
२२) सुरज रघुवीर मेश्राम रा. जुनी खल्लाशी लाईन नागपुर,
२३) कन्हान-पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक डेनियल शेंडे रा. सत्रापुर कन्हान,
२४) संदीप बुरेले रा. महादुला कोराडी नागपुर हे खेळतांना दिसले असुन २२ जुगारी इसमांना ताब्यात घेण्यात आले व २ फरार असे एकुण २४ इसमां विरुद्ध कायदे शीर कार्यवाही करण्यात आली असुन जुगारी इसमांनी सदर चा जुगार हा डेनियल शेंडे रा. सत्रापुर व संदीप गुरीले रा.कोराडी हे भरवित असल्याचे सांगितले असु न ते दोघे ही फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी २२ जुगारींना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्या तुन नगदी २,४६,७२० रू, तासपत्ते, १७ मोबाईल किम त ३,०४,००० रू, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन किमत १४,५०,००० रू, व जुगाराचे इतर साहित्य असा एकुण २०,०१,२४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन कन्हान येथे अप.क्र. ४९५/२२ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनि यम सहकलम १०९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता कन्हान पोलीसांना स्वाधिन करण्या त आले आहे. सदर कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोली स अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधिक्ष क राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सफौ चंद्रशेखर घडेकर, पोहवा विनोद काळे, पोना मयुर ढेकळे, अमृत किंगे, रोहन डाखोरे, प्रणय बनाफर, अमोल वाघ, महेश बिसने, चापोशी आशुतोष लांजेवार , सुमित बांगडे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.