कन्हान : – शहराच्या हद्दीत असलेला बोरडा-कांद्री टोल नाक्याच्या बाजुला असलेल्या कांद्री शिवार शेता तील खोली मध्ये अज्ञात चोरांनी एकुण विस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोली सांनी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
रविवार (दि.२८) ऑगस्ट सांयकाळी पाच वाजता ते सोमवार (दि.२९) ला दुपारी अकरा वाजता दरम्यान घडली. उमेश विठ्ठलराव कावळे वय ६२ वर्ष रा.खरबी, नागपुर यांची बोरडा-कांद्री टोल नाका कॅनलला लागुन कांद्री शेत शिवारात पावणे पाच एकड शेतात धान पिक घेतलेले आहे. त्यामुळे शेतात सामान ठेवण्या करीता खोली बनवलेली होती.
याकरीता आठवड्या तुन दोन तीन दिवस यायचे. सोमवार (दि.२९) रोजी उमेश कावळे हे शेतामध्ये आले असता त्यांना शेता मध्ये खुल्या जागेत असलेली खोली उघडी दिसली व आत प्रवेश करून पाहणी केली असता खोली मध्ये असलेली ५ एच.पी. हाऊस पावर मशीन किंमत १४,००० रु, ४ खताची बॅग किंमत ५,४०० रु, व दोन प्लाॅस्टिक चेअर किंमत ६०० रुपये असा एकुण २०,००० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी उमेश कावळे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.