Published On : Mon, Sep 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केले विद्यार्थी सुरक्षा सोशल मिडिया माहितीपत्रकाचे लोकार्पण.

वर्षभर विविध शाळांमध्ये चालणार शिबिरे.

नागपूर: अगदी लहान मुलेही आता सोशल मिडियाचा वापर करीत असून त्याच्या नुकसानीपासून अनभिज्ञ आहे. शालेय विद्यार्थ्यांत सोशल मिडियाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने माहितीपत्रिका तयार करण्यात आली. या माहितीपत्रिकेचे लोकार्पण भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केले. विद्यार्थ्यांत जनजागृती करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

मुलांना सोशल मिडिया व ऑनलाईन गेमचे वेड लागले आहे. त्यामुळे पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.

या मुलांना त्यांच्या शाळेत जाऊन मार्गदर्शन शिबिर घेण्यासाठी श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे व सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी पुढाकार घेतला आहे.

पारसे यांनी विद्यार्थ्यांत जनजागृतीसाठी माहितीपत्रिका तयार केली. या माहितीपत्रिकेचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी कोराडी येथील जगदंबा मंदिरात लोकार्पण केले.

माहितीपत्रिकेतून विद्यार्थ्यांना ऑनलाईन गेम खेळताना काय करू नये, याबाबत माहिती देण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालयाबाबत, मोबाईल क्रमांक, घरातील सदस्यांबाबत कुणालाही माहिती देऊ नये, असमाजिक विषयांवर चर्चा करू नये, घरातील आर्थिक स्थितीची माहिती कुणालाही देऊ नये, आदी आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ऑनलाईन गेमचा मर्यादित वापर करावा, आपल्या सोशल मिडिया ग्रुपची माहिती कुणालाही देऊ नये, असा मंत्रही विद्यार्थ्यांना देण्यात आला.

ही माहितीपत्रिका विविध शाळांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित शिबिरांत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याचे पारसे यांनी नमुद केले.

– Ajeet Parse, Social Media Analyst and Strategist.
www.webnagpur.com