नागपुर – विकासात्मक कामे करणारी महाराष्ट्रातील एकमेव असलेली काॅन्ट्रक्टर अॅन्ड बिल्डर्स असोशिएशन ऑफ विदर्भच्या अध्यक्षपदी डॉ. प्रवीण महाजन तर सचिवपदी इंजि. मोरेश्वर ढोबळे, उपाध्यक्षपदी बी. सी. के. नायर, इंजि. पवन चोखानी यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून इंजि. पियुष मुसळे असतील. सहसचिव म्हणून मिलिंद हिवलेकर काम पाहतील. सदस्यपदी इंजि. रमन झलके, इंजि. हितेश बिसेन, इंजि. शिरीष चक्रदेव, इंजि. कमलेश लांजेवार, इंजि. संदीप भोयर, संजीव शर्मा, इंजि. रोशन खंगार असतील.
जिल्हा प्रतिनिधी म्हणून, बुलढाणा इंजि. पी. आर. पाटील, अकोला इंजि. संजय खैरनार, अमरावती इंजि. पाटील, वाशिम इंजि. तेजस वानखडे, यवतमाळ राजाभाऊ राऊत, वर्धा इंजि. प्रतीक दप्तरी, चंद्रपूर इंजि. सुभाष कासमकोटुवार, गडचिरोली गुरवा रेड्डी, गोंदिया इंजि.राधा रमण अग्रवाल, भंडारा इंजि. मोहन नायर, नागपूर इंजि. तन्मय फडणवीस यांची निवड झाली. महाराष्ट्रात विकासात्मक कामे करणाऱ्या डेव्हलपराची ही असोशिएशन असून पहिल्यांदाच चोवीस सदस्यात अठरा सदस्य हे इंजिनिअर आहेत तर उरलेले सदस्य हे उच्च शिक्षित आहेत.
काल झालेल्या त्रैवार्षिक निवडणूकीत निवडून आलेल्या कार्यकारणीने हा निर्णय घेतला. विद्यमान कार्यकारीणीचा तीन वर्षाचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर आगामी तीन वर्षांसाठी सन 2022 ते 2025 या कालावधीकरीता निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी अँड. करण दमे यांनी निवडणूकप्रक्रिया पार पाडली.
निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजनयांनी सर्व नवनिर्वाचित सदस्याचे स्वागत करून असोशिएशनच्या सदस्यांच्या असलेल्या समस्यासाठी कार्य करण्याचे आव्हन केले. यात खालील समस्येवर चर्चा झाली.
गेल्या तीन वर्षांत अनेक कंत्राटदाराना झालेली निविदानिहाय मदत. सांकेताक क्रमांक त्वरीत देण्याचा झालेला निर्णय, बीलासाठीचा कालावधी कमी करून त्वरीत होत असलेले भुगतान, कोवीडमध्ये केलेली रूग्ण सेवा, नागपूर महानगरपालिकेला दिलेल्या दोन रुग्णवाहिका, सदस्यांच्या वैयक्तिक निविदा अडचणी सोडविणे याकरीता असोसएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी केलेले प्रयत्न याकरीता त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारणीचे कौतुक करण्यातआले. सचिव बी. सी. के. नायर यांनी आभार मानले. सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली नंतर सभा स्थगित करण्यात आली.