Published On : Wed, Sep 14th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बुस्टर डोस लसीकरणासाठी शेवटचे १५ दिवस

Advertisement

लसीकरणासाठी अमृत महोत्सवीय महाअभियान

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या लसीकरणासाठी आता फक्त शेवटचे १५ दिवस शिल्लक आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर नि:शुल्क लसीकरण करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

Today’s Rate
Monday 07 Oct. 2024
Gold 24 KT 76,000 /-
Gold 22 KT 70,700 /-
Silver / Kg 93,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ दिवस नि:शुल्क बुस्टर डोसचे महाअभियान मनपाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले होते. मनपा आणि शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर नि:शुल्क बुस्टर डोस उपलब्ध आहे. यासोबतच सर्व केंद्रांवर १२ ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कॉर्बेव्हॅक्स लस सुद्धा उपलब्ध आहे.

Advertisement

कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन ६ महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुस-या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

आता पर्यंत नागपूर शहरातील एकूण ३,६६,०१५ नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस घेतला आहे. आरोग्य विभागातर्फे एकूण ४३,३६,५७७ कोव्हिड प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आलेल्या असून यामध्ये पहिला डोस घेणारे २१,९२,१३८ तसेच दुसरा डोस घेणारे १७,७८४२४ नागरिकांचा समावेश आहे. विभागाने आपले निर्धारित लक्ष प्राप्त केले असून उर्वरित नागरिकांनी सुद्धा बुस्टर डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना बुस्टर डोस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहरातील बुस्टर डोससाठी पात्र प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मनपातर्फे सार्वजनिक गणेश मंडळ मध्ये सुद्धा नागरिकांना कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस लावण्यात आले आहेत. तसेच बाजारपेठेत सुद्धा लसीकरण केले जात आहे.

मनपाचे लसीकरण केंद्र

झोन क्र. १ लक्ष्मीनगर झोन : कामगार नगर यूपीएचसी, कामगार कॉलनी, सुभाष नगर, जयताळा यूपीएचसी, जयताळा, खामला यूपीएचसी, खामला नागपूर

झोन क्र. २ धरमपेठ झोन : फुटाळा यूपीएचसी, अमरावती रोड, गल्ली क्र. ३ सदर रोग निदान केंद्र, रेसिडेन्सी रोड, सदर, सुदाम नगर यूपीएचसी, पांढराबोडी हिल टॉप, के.टी. नगर यूपीएचसी, के.टी.नगर, हजारीपहाड यूपीएचसी, हजारीपहाड, डिक दवाखाना, व्हीआयपी रोड, धरमपेठ, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर

झोन क्र. ३ हनुमाननगर झोन : मानेवाडा यूपीएचसी, शाहू नगर, नरसाळा यूपीएचसी, नरसाळा, हुडकेश्वर यूपीएचसी, हुडकेश्वर

झोन क्र. ४ धंतोली झोन : GMC शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (फक्त कोव्हॅक्सीन), बाबुलखेडा यूपीएचसी, मानवता हायस्कूलजवळ, आयसोलेशन हॉस्पिटल, इमामवाडा, एम्स हॉस्पीटल, मिहान, नागपूर (कोव्हॅक्सीन + कोव्हिशिल्ड)

झोन क्र. ५ नेहरूनगर झोन : बिडीपेठ युपीएचसी, बिडीपेठ, ताजबाग यूपीएचसी, बडा ताजबाग, नंदनवन यूपीएचसी, दर्शन कॉलनी, दिघोरी यूपीएचसी, जिजामाता नगर

झोन क्र. ६ गांधीबाग झोन : महाल रोगनिदान केंद्र, महाल, भालदारपुरा युपीएचसी, IGMC (मेयो हॉस्पीटल) (फक्त कोव्हिशिल्ड), बजेरिया, मोमिनपूरा यूपीएचसी, मोमिनपूरा, डागा

झोन क्र. ७ सतरंजीपुरा झोन : मेहंदीबाग यूपीएचसी, मेहंदीबाग, कुंदनलाल गुप्ता यूपीएचसी, मनपा शाळेजवळ, जगनाथ बुधवारी युपीएचसी, गोळीबार चौक, शांतीनगर यूपीएचसी, शांतीनगर, सतरंजीपूरा यूपीएचसी

झोन क्र. ८ लकडगंज झोन : डिप्टी सिग्नल युपीएचसी, संजय नगर, डिप्टी सिग्नल, पारडी युपीएचसी, पारडी, भरतवाडा युपीएचसी, विजय नगर, भरतवाडा, हिवरी नगर युपीएचसी, हिवरी नगर

झोन क्र. ९ आशीनगर झोन : पाचपावली युपीएचसी लष्करीबाग, आवळेबाबु चौक, कपिल नगर यूपीएचसी, कपिल नगर, शेंडे नगर युपीएचसी, शेंडे नगर, बंदे नवाज युपीएचसी, गरीब नवाज युपीएचसी, आंबेडकर हॉस्पीटल, कामठी रोड येथे (फक्त कोव्हॅक्सीन)

झोन क्र. १० मंगळवारी झोन : गोरेवाडा यूपीएचसी, गोरेवाडा वस्ती, झिंगाबाई टाकळी यूपीएचसी, झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती, इंदोरा यूपीएचसी, बेझनबाग, नारा यूपीएचसी, नारा.