Published On : Thu, Sep 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कल्पेश बावनकुळे च्या हत्याचे आरोपी ४८ तासात अटक करा – जाधव

Advertisement

– कन्हान व ग्रामिण मध्ये रात्रीची पोलीस गस्त नियमित करून बोरडा चौकात सीसी टीव्ही कॅमरे, पोलीस चौकी ची संताजी ब्रिगेडची मागणी.

कन्हान : – नागपुर वरून कन्हान बोरडा मार्गे बनपुरी घरी परत जाणा-या कल्पेश बावनकुळे ची अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे हत्या केल्याने कन्हान शहर व ग्रामिण भागात भयंकर भितीचे वाता वरण निर्माण झाल्याने हत्या करण्या-या आरोपीताना ४८ तासाच्या आत अटक करून कन्हान व ग्रामिण भागात रात्रीला नियमित पोलीस गस्त करून नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील बोरडा रोड चौकात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमरे त्वरित लावण्यात यावे. अन्यथा उग्र आंदोलना इशारा शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात शिवसेना रामटेक विधानसभा व संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा प्रदेश उपाध्यक्ष महेन्द्र भुरे व्दारे मा उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान हयाना शिष्टमंडळाने निवेदन देऊन दिला.

Today’s Rate
Monday 07 Oct. 2024
Gold 24 KT 76,000 /-
Gold 22 KT 70,700 /-
Silver / Kg 93,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बुधवार (दि.१४) सप्टेंबर ला रामटेक लोकसभा शिवसेना माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रामटेक विधानसभा संघचक प्रेम रोडेकर व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष महेन्द्र भुरे यांच्या नेतृत्वात शिवसेना व तेली समाजाचा संयुक्त शिष्टमंडळाने कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान मुख्तार बागवान हयाना शिष्टमंडळा ने भेटुन चर्चा करित निवेदन देऊन शनिवार (दि.१०) सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्री कल्पेश भगवान बावन कुळे, रा बनपुरी यांची काही अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे निर्घृण हत्या केली.

Advertisement

परंतु आज चौथा दिवस उजाळुन ८५ तास झाले तरी हत्येचे आरोपी अटक करण्यास पोलीस प्रशासनाला अद्याप यश न आल्याने बनपुरी, कांद्री- कन्हान व ग्रामिण परिसरात चांगलेच भिंतीचे वातावरण निर्माण होऊन तेली समाजात आणि नागरिकात पोलीस प्रशासना विरूध्द रोष निर्माण होत आहे.

यास्तव कांद्री ते नगर धन रोड व नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गा वरील बोरडा रोड चौक ते कन्हान नदी पुला पर्यंत तसेच कन्हान शहर व ग्रामिण भागात रात्री ला पोलीस गस्त (पेट्रोलिंग) नियमित वाढविण्यात यावी. आणि राष्ट्रीय चारपदरी बॉयपास महामार्ग वरिल बोरडा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस चौकी त्वरित लावण्यात यावी. अशी मागणी करून कल्पेश बावणकुळे च्या मारेकऱ्यांना ४८ तासात अटक करावी, अन्यथा तेली समाज सम्पुर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उग्र आंदोलन करेल व उदभवणा-या परिस्थितीची सर्वशी जवाबदारी पोलीस प्रशासनाची राहिल अशा इशारा सुध्दा यावेळी देण्यात आला.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिका री बागवान साहेबांनी कांद्री नगरधन व बोरडा चौक ते कन्हान नदी पुला पर्यंत रात्रीची पोलीस गस्त, पेट्रोलिंग आज रात्री पासुन सुरू करण्याची हमी दिली व बोरडा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि चौकी लावण्या बाबद वरिष्ठ अधिकारी सोबत चर्चा करून माहिती देण्याचा व कल्पेश च्या हत्या-यांना लवकरात लवकर शोध करून अटक करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात शिवसेने चे माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव, प्रेम रोडेकर, दिलीप राईकवार, प्रभाकर बावने, रूपेश सातपुते, पुरुषोत्तम येनेकर, गोविंद जुनघरे, नरेंद्र खडसे, प्रविण गोडे, अनिल ठाकरे, लल्लण कुशवाह, मनोज मेश्राम, बल्ला यादव, विजय बोरकर, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश भोंदे, रवि घावडे, विजय बावनकुळे, सुरेश पारधी, प्रभाकर सावरकर, नंदु घावडे, प्रमोद देशमुख, शुभम घावडे, विठ्ठल बावनकुळे, दिलिप देशमुख, मोहन धांडे, अनिल बारई, आशिष बावनकु ळे, नितिन लेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.