३० सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम
नागपूर: बंगाली कल्चरल सोसायटीच्या दुर्गोत्सवाचे यंदाचे हीरक महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपुरातील सर्वात मोठ्या अशा या हिरक महोत्सवी दुर्गोत्सवाचे उद्घाटन डॉ. संजय मुखर्जी, आयएएस, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) यांच्या हस्ते 30 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
दैनंदिन पूजाविधी व्यतिरिक्त, सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या ठिकाणी समाजातील सर्व स्तरातील शेकडो भाविक हे एकत्र येणार असून आरतीनंतर दररोज संध्याकाळी बहुभाषिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
बंगाली कल्चरल सोसायटी तर्फे काटोल रोड स्थित बाल सदनला उत्सवादरम्यान वार्षिक सामाजिक उपक्रम म्हणून खुर्च्या , पंखे दान करण्यात येणार आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष श्री विजय रामाणी, सरचिटणीस, सल्लागार, श्री स्वपन चक्रवर्ती, कार्यकारी सचिव, श्री बी.के. दत्ता, श्री एस.के. सामंता, कोषाध्यक्ष श्री संदीप पॉल, सौम्येंदू सरकार आहेत, अशी माहिती संयुक्त सरचिटणीस यांच्या तर्फे देण्यात आली आहे.