गुन्हा दाखल,गुन्हेगारी पार्श्वभूमी,3 गुन्ह्याची कबुली!
* गजानन सोसायटीच्या नागरिकांनी केला साहस वीरांचा सत्कार!
वाडी: वाडी नप अंतर्गत गजानन सोसायटी या वसाहती मधील नागरिक बंद घरात रात्री चोऱ्या होण्याच्या घटनेने त्रस्त व भय ग्रस्त झाले होते.अज्ञान चोरट्याने 6 बंद घरात मध्यरात्री दरवाजे-खिडक्या तोडून प्रवेश करून मिळेल ते किमती मुद्देमाल घेऊन गेले.या बाबीची तक्रार व चोरट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गजानन सोसायटी च्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांची भेट घेऊन दिलासा व कार्यवाहीची मागणी केली.पोलीस तपास व कार्यवाही जारी असताना देखील बंद घरांना लक्ष करून चोऱ्या सुरूच होत्या. त्या मुळे नागरिकान मध्ये नाराजी व आक्रोश ही निर्माण झाला. मात्र रविवारी पहाटे 2 मध्यरात्रीच्या सुमारास 2 धाडसी नागरिकांनी या चोरट्याला पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिल्याने नागरिकांत आनंद पसरला असून या श्रीराम गिर्हे व अब्दुल कादिर या दोन धाडसी व जागरूक नागरीकांचा त्याच्या घरी जाऊन गजानन सोसायटीच्या क्रियाशील नागरिक प्रा.सुभाष खाकसे,दिलीप बीरे,चंद्रशेखर निघोट,नायसे,रमेश आंबटकर, संजय जीवनकर, विनोद जगताप, राजेंद्र ढाकरे यांनी सामाजिक भावनेतून त्यांच्या निवासस्थानी पोहचून सत्कार ही केला व कार्यवाहीचा धावता वृतांत समजून घेतला.
गजानन सोसायटी प्लॉट क्र.79 येथे आयुध निर्मानी अंबाझरी चे कामगार नेते श्रीराम गिर्हे हे पहिल्या माळ्यावर तर खाली त्यांचे अब्दुल कादिर हे किरायेदार निवास करतात.त्यांच्या शेजारी घर क्र. 71 हे भीमराव भोरकर यांचे असून ते त्यांनी मानव विकास नामक संस्थेला किरायाने दिले आहे.रविवार असल्याने प्रवेश द्वाराला बाहेरून कुलूप बंद होते.नेमके चोरट्याने हे घर बंद असल्याचा समज करून शनिवारी रात्री 9 च्या सुमारास पाहणी केली.
घर बंद असल्याचे लक्षात येताच त्यांनी रात्री आपल्या आयुधा सह रात्री 2 वाजता या घरात मुख्य दरवाजा तोडून प्रवेश केला व लाईट सुरू करून आतील अलमारी इ.तोडण्याचा प्रयत्न सुरू केला.या तोडफोडीचा आवाज एकताच किरायेदार अब्दुल कादिर यांची झोप उघडली.बाजूचे घर तर बंद आहे मग आवाज कसला?शंका निर्माण होतात त्यांनी वर घरमालक श्रीराम गिर्हे यांना उठविले व हकीकत सांगितली.मग दोघेही सुरक्षेसाठी हातात काठी घेऊन शेजारच्या घराजवळ जाऊन आवाज दिला.आवाज एकताच चोर घाबरला व बाहेर पळू लागला, चोरट्याने भिंतीवरून उडी मारून नाल्याकडून शाहू ले कडे धूम ठोकली.या दोघानेही त्याचा पाठलाग केला असता चोरट्याने उलट या दोघांना दगड मारून आपला बचाव व पळण्याचा प्रयत्न सुरू केला ,या दोघांने स्वतः चा बचाव करून आरडा ओरड केल्याने त्या परिसरातील काही नागरिक ही जागे झाले व शेवटी या दोघांने या चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात यश मिळविले.त्याला पकडून घटनास्थळी आणले व पोलिसांना या बाबीची सूचना दिली या दरम्यान या चोराने घाबरून नुकतेच जेल मधून सुटून आल्या नंतर हे घरफोडीचे काम सुरू केल्याचे सांगितले.वाडी पोलिसांनी घटना स्थळी पोहचून या चोरट्याला ताब्यात घेतले.
वाडी पोलिसांनी हा चोरटा सापडल्याचे समजताच समाधान व्यक्त केले.पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी चौकशी अधिकारी सपोनि ढवळे यांना सखोल तपास व कार्यवाहीचे निर्देश दिले.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याचे नाव किशोर सुखदेव जीवतोडे उर्फ किशोर महेंद्र भगत वय 40 वर्ष असून तो हनुमान मंदीर ,पांढराबोडी, अंबाझरी येथील निवासी आहे.वाडी येथील एका प्रकरणात शिक्षा झाल्याने तो नुकताच कारागृहातुन सुटून वाडी परिसरात परतला होता.
सखोल चौकशी नंतर त्याने गजानन सोसायटीत कांबळे,नायसे ,जोरांडे यांच्या घरी बंद असल्याने चोरी केल्याचे सांगितले व चोरीत सापडलेला साहित्याची विल्हेवाट लावल्याचे सांगितले.वाडी पोलिसांनी त्याच्यावर कलम 280,354,357 नुसार गुन्हा नोंदविला व त्याला अटकेची कार्यवाही करून सोमवारी न्यायालायसमक्ष प्रस्तुत केले असता त्याला 2 दिवसाचा पीसीआर मिळाल्याचे तपास अधिकारी ढवळे यांनी सांगितले.पुढील चौकशीत डॉ.पिंपळकर,मेश्राम यांच्या घरच्या घरफोडी सोबत अधिक कोणकोणत्या बंद घरी त्याने वा त्याच्या साथीदाराला घेऊन चोऱ्या केल्या याची माहिती मिळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.ही वार्ता सोसायटी परिसरात समजताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.व कडक कार्यवाहीची मागणी केली.