मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव श्री श्रीकर परदेशी यांची आज मेट्रो भवनला भेट, मेट्रो राईड
नागपूर: राज्याचे उप मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव आणि सनदी अधिकारी श्री श्रीकर परदेशी यांनी आज मेट्रो भवन ला भेट दिली. नागपूरला राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून त्या निमित्ताने विविध अधिकारी शहरात दखल झाले आहेत. कालच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास विभाग-१) श्री. भूषण गगराणी यांनी झिरो माईल फ्रिडम पार्क – एयरपोर्ट साऊथ – सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने प्रवास केला होता.
श्री श्रीकर परदेशी यांनी आज मेट्रोने प्रवास केला. झिरो माईल मेट्रो स्टेशन येथून मेट्रो गाडीत बसून त्यांनी सीताबर्डी स्टेशन आणि तेथून एक्वा मार्गिकेवरील सर्वात शेवटचे स्थानक लोकमान्य नगर येथवर दौरा केला. लोकमान्य नगर स्थानकावरून त्यांनी महा मेट्रो च्या हिंगणा डेपो ला भेट दिली. या संपूर्ण प्रवासा दरम्यान महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित त्यांच्या सोबत होते आणि त्यांना नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या एकूणच प्रगती संबंधी माहिती त्यांना दिली. श्री श्रीकर परदेशी यांनी हिंगणा डेपोचे देखील निरीक्षण देखील केले.
श्री परदेशी यांनी तत्पश्चात मेट्रो भवन ला भेट दिली. येथील एक्सपीरियंस सेंटर, एक्झिबिशन सेंटर, वाचनालय असे विविध दालन त्यांनी बघितले. मेट्रो भवन येथील विविध व्यवस्था, या वास्तूचे स्थापत्य शास्त्र अश्या विविध बाबींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेली हि व्यवस्था आणि सातत्याने वाढणारी प्रवासी संख्या हि सर्वांकरता सुखावणारी बाब असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर टाळत मेट्रोने परवा करावा हि अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
श्री परदेशी यांच्या या संपूर्ण दौऱ्या दरम्यान महा मेट्रो चे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लांनिंग) श्री अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक (ऑपरेशन) श्री उदय बोरवणकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.