नागपूर: नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मा श्री. अजय गुल्हाने यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही श्री. अजय गुल्हाने यांनी जबाबदारी स्वीकारली.
नागपूरात जन्मलेले श्री. अजय गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) महाराष्ट्र कॅडरच्या २०१० बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला असून ते वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा होते. ते नवी मुंबईतील ‘जलस्वराज्य प्रोजेक्ट’चे प्रकल्प व्यवस्थापक सुद्धा होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चिन्मय गोतमारे यांची गोंदिया येथे बदली झाल्यानंतर श्री. गुल्हाने यांची स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे.
पदभार स्विकारल्यानंतर श्री. गुल्हाने यांनी स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतला. स्मार्ट सिटीतर्फे मुख्य वित्त अधिकारी नेहा झा,कंपनी सचिव श्रीमती भानुप्रिया ठाकूर, महाप्रबंधक राजेश दुफारे, डॉ. शील घुले, राहुल पांडे, अधि. मनजीत नेवारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, मनीष सोनी, अमित शिरपुरकर, सोनाली गेडाम, पराग अर्मल, अनूप लाहोटी यांनी त्यांचे स्वागत केले.