Advertisement
नागपूर: जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नागपूर महानगरपालिकेमध्ये येणा-या प्रत्येक महिलांचे गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून उद्यान विभागाद्वारे मनपातील सर्व कर्मचारी तसेच अभ्यागत महिलांना प्रवेशद्वारावर गुलाबाचे फुल देउन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मनपाच्या या उपक्रमाने भारावलेल्या महिलांनीही या सन्मानाचे कौतुक करीत शुभेच्छांचा स्वीकार केला.