आज एस.एन.डी.टी महिला विद्यापीठात जी 20 च्या धर्तीवर Y20 चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकशाही मध्ये तरुणाईची भूमिका या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एस.एन. डी. टी महिला विद्यापीठाच्या मा.कुलगुरू, प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे मा.संचालक ,प्रा.डॉ.प्रभाकर चव्हाण यांनी केले.
त्यानंतर ॲड.राज सराफ, श्रीम.पल्लवी सप्रे, श्रीम. मिक्षा भट, श्रीम. श्रद्धा सिंग यांनी विद्यार्थिनींशी आजच्या लोकशाहीत तरुणाईच्या भूमिकेविषयी विविध दृष्टीकोनातून चर्चा केली.
या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. मेहुल खळे, जन संपर्क अधिकारी तसेच प्रा.डॉ. प्रभोतेंडुलकर यांनी विशेष मेहनत घेतली.