नागपूर, : धंतोली झोन कार्यालया अंतर्गत दि. 27/03/2023 रोजी सकाळी 11.30 वाजता स्थावर मालमत्ता लिलाव प्रक्रियेची कार्यवाही करण्यात आली. सदरहू लिलाव कार्यवाहीत सहायक आयुक्त किरण बगडे, सहा.अधीक्षक विकास रायबोले, कर निरीक्षक श्री. धोंगडे, श्री. रामटेककर, श्री. मलिक व श्री. चेपे उपस्थित होते.
सहा. आयुक्त सहा /अधीक्षक यांनी दि. 05/03/2023 चा दैनिक हितवाद व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रा नुसार 21 मालमत्ता रूपये 18,45,778 /- रकमेकरीता ज्या मालमत्तांचा लिलाव करावयाचा आहे. त्या मालमत्ता धारकांना / संबंधीतांना /हितचिंतकांना कर भरण्यास आवाहन करण्यात आले तसेच बोलीधारकांना सदर मालमत्तेचे विवरण लिलावाच्या अटी व नियमांची माहिती दिली व रू. 10,000/- चा भरणा करून लिलाव प्रक्रियेत नागरिकांना भाग घेता येईल असे घोषित केले.
त्यावेळी काही नागरीक उपस्थित झाले परंतु लिलाव प्रक्रियेत बोली बोलण्यास आले नाही. मालमत्तेच्या जाहीर लिलावाची घोषणा केल्यानंतर 15 मिनीटाचा अवधी देण्यात आला या अवधीत कोणीही ईच्छुक नागरीक बोलण्यास आले नाही.
लिलाव प्रक्रीया सुरू होण्याआधी एकुण 21 मालमत्ता धारकापैकी एकुण 01 मालमत्ता धारकांनी एकुण 1,72,388 /- रू शास्ती, वारंट फी, जाहीरात खर्चासह बकाया कराचा भरणा केला असल्यामुळे लिलावाचे वेळी उर्वरीत एकुण 20 मालमत्तांची जाहीर लिलावाद्वारे विक्री घोषणा करण्यात आली.
वरील प्रमाणे जाहीर लिलावाद्वारे जाहीर लिलावाची घोषणा दिनांक 27/03/2023 करण्यात आली. परंतु बोली बोलण्यास इच्छुक नागरीक उपस्थित न झाल्यामुळे त्यानंतर 15 मिनिटे वेळ देण्यात आली. त्यानंतर बोलीदार उपस्थित झाले नाही. त्यामुळे सदरहू मिळकती नाममात्र दरात मा. आयुक्त म.न.पा. नागपूर यांच्या नावे झाल्याची घोषणा सहा.आयुक्त धंतोली झोन क्र. 04 यांनी केली. अशा प्रकारे लिलाव प्रक्रिया समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.