Advertisement
नागपूर : कामठी परिसरात नीलम लॉनजवळ संशयित मानवी सांगाडे आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला परिसरात काही सांगाडे दिसले.
त्याने त्वरितच या घटनेची पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तडकाफडकी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सांगाडे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले. ते मानवी आहे की नाही याबाबत अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
हे सिंथेटिक सांगाडे असू शकते. आम्ही याबाबत कोणतीही माहिती देण्यापूर्वी प्रयोगशाळेत त्याची तपासणी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.