नागपूर : रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यावर संपूर्ण जगभरात ईद साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच “रमजान ईद” असे म्हणतात. रमजान ईदला संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्यानिमित्ताने नागपुरातही हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. ईद-उल-फित्रच्या शुभदिनी मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये नमाज अदा केली.
नागपुरात मोमीनपुरा जामा मशीद, फुटबॉल मैदान, जाफर नगर, ताजबाग, टेका नाका, कांप्टी यासह अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली.नमाजानंतर लोकांनी एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जामा मशिदीत पोहोचून लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदचा सण हा आनंद, प्रार्थना आणि कौटुंबिक मेळाव्याचा मानला जातो. या दिवशी शेवया, दूध, आणि सुक्यामेव्या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते.