Advertisement
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी आगीचे तांडव सुरु आहे.आज सकाळी नागपूरच्या कमाल चौकातील हार्डवेयरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
नुकतेच नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी भागातील कटेरिया अॅग्रो कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली. यात तीन कामगारांचा होरपळून मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत.