नागपूर: भारताकडे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद असल्याचे यासंदर्भात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 20 आणि 21 मार्च रोजी नागपुरात C-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारने या महासंमेलनाचे आयोजन करण्यासाठी नागपूरला मोठी रक्कम दिल्याची माहिती आहे.
नागपूर शहराला C-20 साठी मिळालेल्या निधीचा आणि खर्चाचा तपशील अलीकडेच माहितीच्या अधिकारातून उघड करण्यात आला आहे. कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबतची माहिती मिळवली आहे.
एकंदरीत या परिषदेसाठी 140 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या पैशांचा वापर 93 कामांसाठी करण्यात आला असून यातील सर्वाधिक खर्च सुशोभिकरण आणि दिवाबत्तीवर झाला.हे मुख्यतः दक्षिण-पश्चिम , पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपुरातील काही भागात केले गेले. त्यांच्यापैकी भरपूर कामे ही वर्धा रोड येथे झाली. विमानतळ, हॉटेल प्राइड आणि ले मेरिडियन याठिकाणीही या परिषदेची तयारी युद्ध पातळीवर करण्यात आली.
C20 परिषदेसाठी महापालिकेला झालेला खर्च :
– वर्टिकल गार्डन तयार केले — 90 लाख रु.
– उभारलेले G-20 ध्वज — 50 लाख रु
– विमानतळ सुशोभीकरण – 4.45 कोटी रुपये
-शिवणगाव फाटा सुशोभिकरण – रु. 1.25 कोटी
-गोवारी स्मारकाचे सुशोभीकरण – 61 लाख रुपये
– NMC मध्यवर्ती कार्यालय – रु 82 लाख
– मोठ्या उद्यानांमध्ये सेल्फी पॉइंट – 30 लाख रुपये
– मेजर सुरेंद्र देव पार्क, धंतोलीचे सुशोभीकरण – 2.38 कोटी रुपये
– G20 कौन्सिलच्या ब्रँडिंगसाठी प्रमोशनल कामे — रु 10 कोटी
– रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या जागेवर बांधकामे – 1.42 कोटी रुपये
– रॅडिसन ब्लू हॉटेल परिसर सुशोभीकरण आणि प्लाझा — ७० लाख रु
– सीताबर्डी फ्लायओव्हर अंतर्गत सुशोभीकरण – 2.85 कोटी रुपये
निधीचे वितरण:
– NMC ला 30 नोव्हेंबर 2022 रोजी 49.77 कोटी रुपये मिळाले
29 मार्च 2022 रोजी 122 कोटी रुपये मिळाले
– महापालिकेच्या विद्युत विभागाला 60.22 कोटी रुपये मिळाले