Advertisement
नागपूर : शहरात कोरोनाचे संकट कायम आहे. यापार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांना खबरदारी घेणे गरजेचे असून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
यातच नागपुरात नाकावाटे घेण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र ही लस ६० वर्षांवरील पात्र नागरिकांनाच मिळेल. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिने झालेल्यांनाच ‘बूस्टर डोस’च्या स्वरूपात नाकावाटे हा डोस देण्यात येईल.
नागपूर जिल्ह्याला या लसीचे ५०० डोस मिळाले. यातील २५० डोस शहराला तर २५० डोस ग्रामीणला उपलब्ध करून देण्यात आले. भारत बायोटेकच्या या नेझल व्हॅक्सिन ‘इन्कोव्हॅक’ला २३ डिसेंबर २०२२ रोजी केंद्राने परवानगी दिली.